बेला : मराठी पत्रकार संघ शाखा बेलाच्या वतीने ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने घेण्यात आलेला ‘ मी सरपंच बोलतोय ‘ या सामाजिक कार्यक्रमास मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अंदाजे दोन हजार स्त्री ,पुरुष मतदारांनी कार्यक्रमास हजेरी लावली होती.
बसस्थानकासमोरील ग्रामसचिवालयाचे इमारतीसमोर ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत 14 डिसेंबरला सायंकाळी सात वाजता सदर कार्यक्रम थाटात व उत्साहात पार पडला. यावेळी मंचावर काँग्रेस गटाचे उमेदवार यशवंत डेकाटे, भाजप समर्थित पॅनेलचे प्रशांत नागोसे, सेना राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचे माजी उपसरपंच सुभाष तेलरांधे व अपक्ष माजी सरपंच अरुण बालपांडे, गजानन लांडे ,पंकज रोडे ,संदीप मस्कर, महेश बोकडे, विवेक तायवाडे व मनीष उर्फ राजू बारापात्रे असे सरपंच पदाचे सर्व दहा उमेदवार प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी आपला विकास कामाचा जाहीरनामा जनतेसमोर व्यक्त केले. कार्यक्रमाचे शानदार सूत्र संचालन बेला पत्रकार संघाचे सचिव दिनेश गोळघाटे यांनी केले. जनतेकडून गावाच्या विकासा बाबत आलेले प्रश्न पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोदकुमार डांगरे ,निवृत्त प्राचार्य भाऊराव तळवेकर व प्रवीण फालके यांनी विचारले. कार्यक्रमास कार्यक्रम ऐकण्यास जि प सदस्या वंदना बालपांडे, माजी सरपंच सुनंदा उकुंडे पत्रकार व पं. स. सदस्य पुष्कर डांगरे, तंटामुक्ती अध्यक्ष ज्योती कुमार देशमुख, ज्येष्ठ पत्रकार उत्तम पराते, कुंडलिक व जितू कामडी, राजेश जांभुळे, सुरज कांबळे संदीप धंदरे आशिष सोनटक्के राजू चिपडा आदी मान्यवर उपस्थित होते. संभाषण व वार्तालापात सुभाष तेलरांधे, पंकज रोडे व गजानन लांडे यांचे भाषणाला मतदारांकडून उत्स्फूर्त टाळ्या मिळाल्या. कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगिताने झाला.