संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 5 :- कामठी -मौदा विधानसभा क्षेत्राचे आमदार टेकचंद सावरकर यांच्या नेतृत्वाखाली कामठी येथे आज 5 एप्रिल ला सायंकाळी 5 वाजता भारतीय जनता पार्टी व शिवसेनाच्या वतीने काढण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला कामठी शहर व तालुक्यातील हजारोच्या संख्येत सहभाग दर्शविलेल्या नागरिकांनी स्वातंत्र्य वीर गौरव यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सावरकर गौरव यात्रा ही कामठी येथील राम मंदिर येथून काढण्यात आली असून ही यात्रा शांततेत ,शिस्तीत व नियोजनपूर्वक काढण्यात आली तर घोडा बग्गी रथ मध्ये वीर सावरकर यांची प्रतिमा ठेवून स्वातंत्र्य वीर सावरकर यांचा जीवनपट सादर करण्यात आला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार टेकचंद सावरकर यांच्या नेतृत्वाखाली सावरकर गौरव गीते,देशभक्तीपर गीते,पारंपरिक वाद्य यांच्या वातावरण निर्मितीत स्वातंत्र्य वीर सावरकर गौरव रथ यात्रा शहरातील राम मंदिर,आदी मार्गे भ्रमण करीत दुर्गा चौकात जँगी सभा घेऊन समारोप करण्यात आला.
राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबत केलेल्या अनुदगार बद्दल निषेध करत सावरकर रथयात्रा काढण्यात आली.गौरव यात्रेत सर्वांनी ‘मी सावरक टोपी’घालून ‘मी सावरकर’पट्टा टाकून मी सावरकर ‘घोषणा देत यात्रेला सुरुवात करण्यात आली. आमदार टेकचंद सावरकर , भाजपा पदाधिकारी माजी आमदार गिरीश व्यास, माजी आमदार सुधाकर कोहले, वक्ता अमोल ठाकरे,माजी जी प सदस्य अनिल निधान ,अज्जू अग्रवाल, डी डी सोनटक्के महादुला अध्यक्ष राजेश रंगारी अजय बोढारे,जि प सदस्य मोहन माकडे, शुभांगी गायधने, माजी जि प अध्यक्ष निशा सावरकर मौदा अध्यक्ष हरीश जैन कामठी तालुका अध्यक्ष किशोर बेले नागपुर ग्रामीण अध्यक्ष सचिन कोड़े,सरपंच पंकज साबळे,चेतन खडसे,माजी सरपंच बंडू कापसे,माजी नगरसेवक कपिल गायधने,उज्वल रायबोले, प्रमोद वर्णम,विजय कोंडुलवार,कामठी अध्यक्ष संजय कनोजिया, शिवसेनाचे शुभम नवले, राजन सिंग,सरपंच ,विविध संस्थांचे पदाधिकारी ,कार्यकर्ते ,नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.