मोदी@9 महासंपर्क अभियानात व्यापारी संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

गडचिरोली व ब्रम्हपुरी येथे शेकडो कार्यकर्ते पदाधिका-यांची उपस्थिती

नागपूर् :- मोदी@9 महासंपर्क अभियानाच्या अंतर्गत घेण्यात येत असलेल्या व्यापारी संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मध्य प्रदेश सरकार मधील सहकारिता एवं लोक सेवा प्रबंधन विभागाचे मंत्री डॉ. अरविंद सिंग भदौरिया यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर, गडचिरोली-चिमुर, भंडारा-गोंदिया आणि वर्धा या चार लोकसभा मतदार संघामध्ये हे अभियान सुरू आहे.

ना. डॉ. अरविंद सिंग भदौरिया यांच्या या अभियानातील प्रवास व संवाद दौऱ्यात गुजरात राजकोट येथील राज्यसभा खासदार रामभाई मोखारिया, क्लस्टर प्रमुख खासदार रामदास तडस व क्लस्टर संपर्क प्रमुख भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम हे उपस्थित आहेत.

शुक्रवारी ९ जून रोजी गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघातील गडचिरोली येथे व्यापारी संमेलन पार पडले. स्थानिक खासदार व अनुसूचित जमाती राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते, आमदार देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे यांनी मोदी@9 महासंपर्क अभिनायानंतर्गत व्यापारी संमेलानाचे आयोजन केले होते.

यावेळी ना. डॉ. अरविंद सिंह भदौरिया, खासदार रामभाई मकोरिया, खासदार रामदास तडस व प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी आपले विचार मांडले. तालुक्यातील जवळपास १५० व्यापा-यांनी या संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला.

मोदी@9 महासंपर्क अभियाना अंतर्गत शुक्रवारी ब्रम्हपुरी येथे पदाधिकारी कार्यकर्ता बैठक पार पडली. या बैठकीमध्ये ना. डॉ. अरविंद सिंह भदौरिया, खासदार रामभाई मोकारिया, क्लस्टर प्रमुख खासदार रामदास तडस व क्लस्टर संपर्क प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी पदाधिका-यांना संबोधित केले.

यावेळी स्थानिक खासदार अशोक नेते, जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, माजी आमदार अतुल देशकर यांच्यासह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अग्निवीर सैन्यभरती मेळाव्याला नागपूरमध्ये सुरुवात

Sun Jun 11 , 2023
रात्री 12 पासून शारीरिक चाचणीला प्रारंभ ; 17 जूनपर्यंत चालेल प्रक्रिया नागपूर :- विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे शुक्रवारी मध्यरात्री अग्निवीर सैन्यभरती मेळाव्याला शिस्तबद्ध सुरुवात झाली. बुलडाणा वगळता विदर्भातील दहा जिल्ह्यातील उमेदवार या भरती मेळाव्यात सहभागी होत आहेत. पहिल्या दिवशी भंडारा जिल्हयातील ७८० उमेदवारांची चाचणी झाली. देशातील दुसऱ्या वर्षातील सैन्य भरतीची सुरुवात नागपूर येथून या अग्निवीर मेळाव्यामार्फत झाली आहे. यावर्षी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com