अरोली :- निमखेडा – चाचेर जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत येत असलेल्या खंडाळा व गांगनेर या गावाच्या मधोमध असलेल्या रेल्वे फाटक, इतर रेल्वे फाटकांच्या तुलनेत अर्धातास ,पाऊण तास तर कधीकधी सात ते आठ गाड्या पास झाल्यानंतर, दोन ते तीन गाड्या एका मागून एक सिग्नल अभावी फाटकावर किंवा फाटका जवळच थांबवाव्या लागत असल्याने, सिग्नल क्लियर होऊन त्या पुढे जाईपर्यंत जवळपास एक तासानंतर फाटक उघडण्यात येत असल्याने, या मार्गावरील आवागमन करणारे दुचाकी धारक, चार चाकी धारक मागील अनेक वर्षापासून कमालीचे त्रस्त आहेत. हा त्रास दूर होण्यासाठी मागील एक वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते येथील रेल्वे उड्डाणपुलाचे ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले.
त्या कामाला सुरुवात झालेली आहे, कामाची गती वाढवून रेल्वे फाटकावरील नागरिकांना होणारा त्रास कमी करावा अशी मागणी खंडाळा (गांगनेर )सरपंच संकेत झाडे सह धुलीवंदनाच्या दिवशी सकाळी आठ ते नऊ दरम्यान एक तास बंद फाटका अभावी फाटकावर उपस्थित असलेल्या नागरिक निसतखेडा येथील राधेश्याम दारोडे, गांगणेर येथील प्रवीण राऊत, सुरज मेश्राम, विजय सोनसरे , बाबुराव सहारे,नरसाळा येथील महेश मेश्राम, बाबुरखेडा येथील सौरभ झुरे, खंडाळा येथील पंकज वाघमारे, सतीश वाघमारे, चाचेर कृष्णा रेड्डी, सतीश चीटोरी, नारायण वाकलपुडी , हिवरा येथील पवन खंडाईत सह समस्त शेकडो वाहनधारकांनी केली आहे. रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने तेथून धान किंवा गहू कापणीचे हार्वेस्टर चे आवागमन करता येत असल्याने खंडाळा व गांगणेर परिसरातील शेतकरी कमालीचे त्रस्त आहे हे विशेष!.