प्रलंबित, तडजोडपात्र प्रकरणासाठी २९ जुलै ते ३ ऑगस्ट २०२४ पर्यंत विशेष लोकअदालत सप्ताह

मुंबई :- लोकअदालतीव्दारे पक्षकारांना जलद गतीने मिळणारा दिलासा लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याकडे प्रलंबित असलेली तडजोडपात्र प्रकरणे जलद गतीने निकाली काढण्यासाठी विशेष लोकअदालत सप्ताहाचे आयोजन केले आहे. ही विशेष लोकअदालत दिनांक २९ जुलै २०२४ ते ३ ऑगस्ट २०२४ या दरम्यान होणार आहे.

लोकअदालतीमध्ये तडजोडीव्दारे निकाली निघालेल्या प्रकरणांमुळे प्रकरणातील पक्षकारांसोबत शासन आणि समाज या दोन्ही घटकांना मोठा लाभ प्राप्त झाला आहे. लोकअदालतीमुळे न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करण्यामध्ये मोठया प्रमाणात यश प्राप्त झाले आहे. न्यायालयातील तडजोड पात्र प्रलंबित प्रकरणे आपसी सामंजस्यातून तडजोडीव्दारे निकाली काढण्याकरिता लोकअदालत हे प्रभावी माध्यम म्हणून समोर आलेले आहे. यामुळे विशेष लोकअदालती मार्फत सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली तडजोडपात्र प्रकरणे लोकअदालतीच्या माध्यमातून निकाली काढण्यात येणार आहेत.

मा. सर्वोच्च न्यायालयाने लोकअदालतमध्ये ठेवलेल्या प्रकरणांची यादी https://legalservices.maharashtra.gov.in/Site/Upload/Pdf/MAHARASHTRA.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी ज्यांची प्रकरणे या यादीमध्ये असतील त्यांनी स्वतः अथवा वकीलांमार्फत महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई किंवा संबंधीत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधून याचा लाभ पक्षकारांनी घ्यावा, असे आवाहन सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी केले आहे.

संपर्कासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे संपर्क क्रमांक (कंसात) पुढीलप्रमाणे : अकोला (८५९१९०३९३०), बीड (८५९१९०३६२३), चंद्रपूर (८५९१९०३९३४), गोंदिया (८५९१९०३९३५), कोल्हापूर (८५९१९०३६०९), नांदेड (८५९१९०३६२६), उस्मानाबाद (८५९१९०३६२५), रायगड (८५९१९०३६०६), सातारा (८५९१९०३६११), ठाणे (८५९१९०३६०४), यवतमाळ (८५९१९०३६२९), अहमदनगर (८५९१९०३६१६), अमरावती (८५९१९०३६२७), भंडारा (८५९१९०३९३६), धुळे (८५९१९०३६१८), जळगाव (८५९१९०३६१९), लातूर (८५९१९०३६२४), नंदूरबार (८५९१९०३९३९), , परभणी (८५९१९०३६२२), रत्नागिरी (८५९१९०३६०८), सोलापूर (८५९१९०३६१३), वर्धा (८५९१९०३९३२), मुंबई (८५९१९०३६०१), औरंगाबाद (८५९१९०३६२०), बुलढाणा (८५९१९०३६२८), गडचिरोली (८५९१९०३९३३), जालना (८५९१९०३६२१), नागपूर (८५९१९०३९३१), नाशिक (८५९१९०३६१५), पुणे (८५९१९०३६१२), सांगली (८५९१९०३६१०), सिंधुदूर्ग (८५९१९०३६०७), वाशिम (८५९१९०३९३७) आणि मुंबई उपनगर (८५९१९०३६०२).

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांची कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

Fri Jun 14 , 2024
मुंबई :- राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी आज डॉ. ज्ञानदेव कुंडलिक म्हस्के यांची सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती केली आहे. सातारा येथील डॉ. धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय येथे प्राचार्य असलेल्या डॉ ज्ञानदेव म्हस्के यांची नियुक्ती पदभार स्वीकारल्यानंतर पाच वर्षांच्या कालावधीकरिता किंवा ते वयाची ६५ वर्षे पूर्ण करतील, त्या दिवसापर्यंत असेल. सातारा येथे नव्याने स्थापन झालेल्या कर्मवीर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com