कोकण पदवधीर/शिक्षक मतदारांना 26 जून,2024 रोजी विशेष नैमित्तीक रजा मंजूर

नवी मुंबई :- कोकण विभाग पदवीधर मतदार संघातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावणेसाठी मतदानाच्या दिवशी दि. 26 जून, 2024 रोजी पदवीधर/शिक्षक मतदारांना विशेष नैमित्तीक रजा मंजूर करण्यात आली आहे. अशी माहिती उपआयुक्त (सा.प्र.)कोकण विभाग तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

भारत निवडणूक आयोगाने दिनांक 24 मे 2024 च्या प्रसिध्दी पत्रकानुसार महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर,कोकण विभाग पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाचा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. या घोषित कार्यक्रमानूसार कोकण विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचे मतदान बुधवार दि.26 जून 2024 रोजी सकाळी 7.00 ते सायं 6.00 वाजेपर्यंत या वेळेत होणार असून, मतमोजणी दिनांक 01 जुलै,2024 रोजी होणार आहे.

विधानपरिषद शिक्षक/पदवीधर मतदारसंघाकरिता मर्यादित स्वरुपात मतदार असल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा. यासाठी पदवीधर/शिक्षक निवडणूकीमध्ये मतदार असलेल्या व्यक्तीला विशेष नैमित्तीक रजा जाहीर करण्यात आली आहे. सदरची रजा ही त्यांच्या अनुज्ञेय असलेल्या नैमित्तीक रजे व्यतिरिक्त असणार आहे.

या रजे बाबतचा शासन निर्णय www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. जाहीर करण्यात आलेल्या नैमित्तीक रजेचा लाभ घेऊन पदवीधर/शिक्षक मतदारांनी मोठया संख्येने मतदानाचा हक्क बजावाव असे आवाहन उपआयुक्त (सा.प्र.)कोकण विभाग तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात भात, नाचणी, उडिद या पिकांकरीता पीक विमा - कृषी सहसंचालक अंकुश माने

Wed Jun 19 , 2024
– विमा काढण्याचा अंतिम दिनांक 15 जुलै, 2024  नवी मुंबई :- नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे. योजनेत सहभागी शेतकऱ्यांना पेरणी न होणे तसेच पूर, दुष्काळ, पावसातील खंड यामुळे होणारे नुकसान, गारपीट, भूस्खलन, क्षेत्र जलमय होणे, वीज कोसळणे, ढगफुटी अशा स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान व काढणीनंतर शेतात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com