संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– सभापती दिशा चनकापूरे यांच्या प्रयत्नांना यश.
कामठी :- खापरखेडा औष्णिक विद्दूत केंद्रातून निघणारी राख वितरित करण्यासाठी बांधण्यात आलेला कामठी तालुक्यातील वारेगाव राखेचा बंधारा फुटल्याची घटना मागील वर्षी 2022 मध्ये 17 ऑक्टोबर ला घडली असता वारेगावच्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात हे राखमिश्रित पाणी गेल्याने शेतातील उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते ज्यामुळे येथील शेतकरी राजा हवालदिल होऊन चिंताग्रस्त झाला होता.दरम्यान झलेल्या पंचनाम्यानुसार वारेगाव गावातील 11 शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या नुकसान स्थितीला एक वर्षेचा जवळपास काळ लोटत आला होता मात्र नुकसान भरपाई पासून वंचित असलेल्या या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नव्हती यासंदर्भात कामठी पंचायत समितीच्या दिशा चनकापुरे यांनी माजी कॅबिनेट मंत्री सुनील केदार व माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या मार्गदर्शनार्थ संबंधित महाजेनको विभागाशी सतत पाठपुरावा केला अंतता यांच्या या पाठपुराव्याला यशप्राप्त झाले व नुकसान भरपाई पासून वंचित असलेल्या 11 शेतकऱ्याना महाजेनको कडून नुकसान भरपाई देण्यात आले.
नुकसान भरपाई पासून मागील दहा महिन्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना अखेर न्याय मिळवुन देण्यात सभापती दिशा चनकापुरे व वारेगाव ग्रा प चे सरपंच कमलाकर बांगरे यांच्या पाठपुराव्याला यशप्राप्त झाल्याबद्दल शेतकऱ्यांनी सभापती दिशा चनकापुरे व सरपंच कमलाकर बांगरे यांचे मनःपूर्वक आभार मानले.