लवकरच सुमित्रा नगर येथे होणार नियमित पाणी पुरवठा

– तांत्रिक अडचणी सोडविणे व गळती दुरुस्तीचे काम सुरु

चंद्रपूर :- अमृत पाणी पुरवठा योजना अंतर्गत सुमित्रा नगर येथे सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर मनपा पाणी पुरवठा विभागातर्फे पाहणी करण्यात आली असुन या कामात असलेल्या तांत्रिक अडचणी सोडविणे व गळती दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे. साधारण १० दिवसांच्या कालावधीनंतर सुमित्रा नगर येथे नियमित पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे.

चंद्रपूर शहर महानगरपालिका क्षेत्रात अमृत योजनेअंतर्गत एकुण १६ झोन तयार करण्यात आले असुन यातील झोन क्र.२ परीसरात सुमित्रानगर वस्ती येते. या वस्ती परीसरात अमृत अभियान अंतर्गत वितरण व्यवस्थेची पाईपलाईन टाकण्यात आलेली असुन नळ जोडणी सुद्धा देण्यात आली आहे. मात्र सदर परीसर हा या झोनचा शेवटचा भाग असल्याने नागरिकांना कमी दाबात पाणी पुरवठा होत असल्याचे चाचणी दरम्यान निदर्शनास आले.

सदर भागात महानगरपालिकेची जुनी पाईपलाईन असल्याने नागरीकांना मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा होण्याच्या दृष्टीने जुन्याच पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा सुरु ठेवण्यात आला होता.मात्र आता सुमित्रा नगर वस्तीतुन अमृत नळाद्वारे पाणी पुरवठा चालु करण्याचे काम सुरु झाले असुन सदर कामात काही ठिकाणी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत तर काही ठिकाणी गळती असल्याने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.सदर काम पुर्ण करण्यास अंदाजे १० दिवसांचा कालावधी लागणार असुन त्यानंतरच सुमित्रा नगर वस्तीत पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अवैध वाळु वाहतुकीचे दोन ट्रक पकडले

Fri May 17 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – चार आरोपी अटक, ४५,५६,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त.  कन्हान :- परिसरातील नदीची वाळु चोरी करण्यात येत असुन शनिवार रविवार सुट्टीच्या दिवसी बिनधास्त मोठया प्रमाणात होत असल्याने कन्हान पोलीसांनी पेट्रोलिंग दरम्यान अवैध वाळु वाहतुक करणाऱ्या दोन ट्रकांना पकडुन चार आरोपींना अटक करून त्यांचे ताब्यातील ४५ लाख ५६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमा लाची जप्त करुन गुन्हा दाखल केला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!