वाडी :- सोनेगाव निपाणी ग्रा.प हद्दीत असलेली कटारिया ऍग्रो बायोमास प्रॉडक्ट्स कंपनी काल शनिवारी रात्री पुन्हा एकदा आगीच्या विळख्यात सापडल्याने परिसरात खळबळ व चिंता दिसून आली.
वाडी नप चे अग्निशमन अधिकारी रोहित शेलारे व सोनेगाव ग्रा.प चे जागरूक सदस्य विनोद लंगोटे यांनी या संदर्भात प्राथमिक माहिती देताना सांगितले की निशांत भारत कटारिया यांच्या मालकीच्या कटारिया ऍग्रो नामक कँपणीत रात्री 11 च्या सुमारास या कँपणीत आग लागल्याचे निदर्शनास आले. आगी ची सूचना MIDC अग्निशमन विभागाला मिळताच 2 वाहने,नागपूर मनपा ची 2 अग्निशमन वाहने व वाडी नप ची अग्निशमन वाहने घटना स्थळी रवाना झाले.आगीची माहिती मिळताच सोनेगाव ग्रा.प चे सदस्य विनोद लंगोटे व अन्य नागरिक घटना स्थळी मदतीला पोहचले.आग लागता वेळी 12-ते 15 कामगार ड्युटी वर उपस्थित होते. या कँपणीत सर्व ऍग्रो विषयक व ज्वलनशील साहित्य असल्याने आग वेगाने पसरली.यात स्वतः चा बचाव करताना 4-5 कामगार किरकोळ जखमी झाल्याचे समजते.रात्री 12 वाजे पर्यंत 8 अग्निशमन गाड्यावरील कर्मचाऱ्यानी जोरदार पणे कार्यवाही करीत ही आग नियंत्रणात आणली. लक्षात असू द्यावे की याच कम्पनित 15 दिवसा पूर्वी भीषण आग लागून 4 कर्मचारीचा भाजून मृत्य झाला होता व काही कर्मचारी जखमी झाले होते.त्या नंतर अधिकारी व विविद्य विभागाणी या कम्पनी ची पाहणी केली होती.असे असतानाही पुन्हा कशी आग लागली,अशा आगीमुळे कामगारांचा जीव तर धोक्यात येतोच गावात ही प्रदूषण व आरोग्याचा प्रश्नन निर्माण होतो. एका वर्षात ही तिसरी आगीची घटना आहे,आग लागतेच कशी? असा प्रश्नन ग्रा.प सदस्य विनोद लंगोटे यांनी उपस्थित करून उच्च स्तरीय चौकशीची मागणी केली आहे.