संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
अभियांत्रिकी मध्ये करिअर घडविणार
कामठी ता प्र – कामठी ,तालुक्यातील लिहीगाव येथील शेतकरी व ग्रामपंचायतचे सरपंच गणेश झोड यांचे यांचा मुलगा निखिल गणेश झोड याने नुकत्याच जाहीर झालेल्या बारावी बोर्ड परीक्षेत विज्ञान शाखेत 86,83 टक्के गुण मिळवून गावाचा नावलौकिक केला निखिल गणेश झोड याने सुरूवातीपासूनच अभ्यासावर मोठ्या प्रमाणात भर देऊन बारावी बोर्ड परीक्षेत 86. 83 टक्के गुण प्राप्त केले सर्वच सहाही विषयात प्राविण्य प्राप्त केले आहेत निखिल झोड याने पुढील अभियांत्रिकीमध्ये करियर घडवून युपीएससी परीक्षेची तयारी करणार असल्याचे सुद्धा सांगितले आहेत निखिल झोड याने 86.83 टक्के गुण प्राप्त केल्यामुळे केल्याबद्दल ग्रामपंचायत सरपंच गणेश झोड ,उपसरपंच सुनीता ठाकरे, ग्राम विकास अधिकारी श्याम उचेकर, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र निकाळजे, सुषमा ठाकरे, विषाखा बोरकर, हरीश निकाळजे ,सुनीता सोनटक्के यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला