कुही :-पोस्टे. कुही पोलीसांना मिळालेल्या गोपणीय माहीतीवरूण कुही पोलीसांनी टेलीफौन चौक कुही येथे दिनांक २३/०३/२०२४ रोजी पहाटे ०४.३० वा सुमारास अचानक नाकाबंदी लावुन वाहनाची तपासणी करित असतांना पाचगाव कडुन कुही कडे एक चार चाकी कार क्र. एम. एच-३१/सी.पी-७६३७ ही येतांना दिसली त्या वाहनाला थांबवुन वाहनाची पाहणी केली असता सदर वाहनाचे मागील डिक्कीमध्ये ईम्पेरीयल ब्लु कंपनीच्या १८० एम एल मापाच्या ७२ शी मिळुण आल्याने सदर दारूच्या परवान्या वावत वाहन चालकाला विचारले असता त्याचे जवळ कोणताही परवाना नसल्याचे सांगितले वरूण स्विष्ट कार एम. एच-३१/सी.पी-७६३७ चा चालक नामे सग्रांम राजेश शर्मा रा. उद्री ता. उमरेड हयाचे विरूध्द गुन्हा नोद करूण ७२ शीषा दारू किंमती प्रति निप १६०/- रू प्रमाणे ११५२०/- रूपये व वाहतुकीसाठी वापरलेले वाहन ए एम. एच-३१/सी. पी-७६३७ किमती १,३०,०००/- रू असा एकूण १,४१,५२०/-रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कार्यवाही पथक पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार भापोसे तसेच अपर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी ठाणेदार IPS मा. दिपक अग्रवाल सा. सहा. पोलीस अधिक्षक पोस्टे कुही सपोनि अमितकुमार आत्राम, पोशी दुर्गेश डहाके व पोलीस स्टेशन कुही येथील होम सैनिक संदीप सातपुते, राजु बगवे, आतिश येळणे, विष्णु मांढरे, प्रमोद बान्ते, जालींदर उके, मयुर काटेखाये, धीरज वंजारी, मयुर हजारे यांनी यशस्वीपणे पुर्ण केलेली आहे.