…तर सोमय्यांना देशभरातून राष्ट्रीय मराठी मोर्चाचा पाठिंबा! वाढीत गुन्हेगारी,महिला अत्याचार विरोधात जनआंदोलन उभारा – आनंद रेखी

मुंबई :- वाढती गुन्हेगारी तसेच महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी देशव्यापी अभियान राबवावे,असे आवाहन राष्ट्रीय मराठी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंद रेखी यांनी रविवारी केले. सोमय्यांनी हे अभियान राबवले तर राष्ट्रीय मराठी मोर्चा त्यांना देशभरातून जाहीर समर्थने देईल, असे देखील रेखी यांनी स्पष्ट केले. राज्यातील अनेक नेते, माजी मंत्र्यांचे भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढून सोमय्या यांनी ‘भ्रष्टाचारमुक्त लोकप्रतिनिधी’च्या संकल्पनेची मुहूर्तमेढ रोवली आहे.दररोज नवनवीन घोटाळे बाहेर काढत सोमय्यांनी तपास यंत्रणांना कामाला लावले आहे.

विरोधक सोमय्यांमुळे पुरते हैराण झाले आहे. कुणावर आपल्याच अनाधिकृत बांधकाम तोडण्याची वेळ आली आहे.तर, कुणाला आपण कसे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहे हे पटवून सांगावे लागत आहे. सोमय्यांच्या या कृतीमुळे निराश झालेले विरोधक त्यांच्यावर वैयक्तिक हल्ले करीत आहेत.पंरतु, भ्रष्टाचार मुक्तीसाठी सोमय्यांनी घेतलेल्या पुढाकाराला राष्ट्रीय मराठी मोर्चाचा पुर्ण पाठिंबा आहे, असे रेखी म्हणाले.

राज्यातील भ्रष्टाचारासह वाढती गुन्हेगारी, महिलांविरोधातील अत्याचार, भुमाफिया तसेच इतर कुप्रवृत्तीला ठेचण्यासाठी सोमय्या यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन राष्ट्रीय मराठी मोर्चाने केले आहे. यासाठी बृह्न्महाराष्ट्रात पसरलेल्या राष्ट्रीय मराठी मोर्चाकडून सोमय्या यांना पाठिंबा देतील, अशी भूमिका देखील रेखी यांनी बोलून दाखवली.सोमय्या यांच्या पुढाकाराने देशातील इतर राज्यातील मराठी बांधव आपापल्या राज्यात जनआंदोलन उभे करतील,असे देखील रेखी म्हणाले.

देशाचे सर्वाधिक यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पारदर्शक कारभारामुळे भ्रष्टाचार रसातळाला गेला आहे. परंतु,भाजपेतर राज्यांमध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप-शिवसेनेचे कर्तृत्ववान सरकार सत्तेत आहे. सरकारचा प्रशासनावर उत्तम पकड आहे. नवीन सरकार सत्तेत येताच राज्यातील गुन्हेगारीवर वचक निर्माण झाला आहे, हे विशेष.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पाटनसावंगी में राष्ट्रीय बजरंगदल प्रवीण तोगड़िया इनकी जाहिर सभा

Mon Feb 6 , 2023
सावनेर : पाटनसावंगी अंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष हिंदुत्व सम्राट डॉ. प्रवीण तोगड़िया इनका हिंदुत्व का प्रचार पूरे देश भर में किया जा रहा है।जिस प्रकार हिंदुत्व के खिलाफ कोई भी कुछ भी बोल देता है।उनके खिलाफ में में लोगो को संबोधित करने के लिऐ पूरे देश भर में हिंदुत्व का प्रचार करने हेतु देश भर में प्रवास […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!