नितीन लिल्हारे
मोहाडी : तुमसर नगरपरिषद येथील विनोबा नगरातील राजाराम लॉन व शकुंतला सभागृह मागील भागात दरवर्षी पावसाळ्यात भरपूर पाणी साचत असल्यामुळे येणाऱ्या मान्सून पूर्वी उपाय योजना करून समस्या ताडतीने मार्गी लावा असे तुमसरचे मुख्याधिकारी यांना जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव प्रा. कमलाकर निखाडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
तुमसर शहरात जर पावसाने झोडपले तर पूरसदृश स्थिती निर्माण होते. पावसाने तुफान बॅटिंग केल्याने नागरिकांच्या घरात आणि दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरते.त्यामुळे लाखो रुपयांचा नुकसानाचा सामना नागरिकांना करावा लागतो. दरवर्षी चक्क पावसाळ्यात तुमसर नगरपरिषद करोडो रुपये खर्च करून गटारे, नाले साफ करण्याचा देखावा करतो, हेच कामे पावसाळ्यापूर्वी व्यवस्थित साफ करून घेतले असते किंवा पावसाचे पाणी साचू नये म्हणून उपाययोजना केली असती तर पावसाळ्यात विनोबा नगरातील राजाराम लॉन व शकुंतला सभागृह मागील भागात परिस्थितीला तोंड द्यावे लागले नसते.
नगराध्यक्ष, प्रशासन व लोकप्रतिनिधींनी दक्षता न घेतल्याने प्रत्येकाच्या प्रभागात पावसाचे पाणी साचले जातात. यामुळे जाणाऱ्या येणाऱ्याला रस्ता पाण्यात तुडुंब भरलेल्या अवस्थेत असल्यामुळे तो रस्ता सुद्दा दिसत नसल्याने नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
सभोवतालच्या परिसरात तलावाचे स्वरूप प्राप्त झाल्याचे चित्र पाहिले होते. अश्या गंभीर परिस्थितीने येथील जनजीवन विस्कळीत होऊन आरोग्यासाठी दरवर्षी आमंत्रण देतो.
परिसरात जलमय झालेल्या परिस्थितीत साप , विंचु , यांचा वावर होतो , राजाराम लॉन व शकुंतला सभागृह मागील परिसरात पावसाळ्यात इतका पाणी का जमा होतो , याबाबतीत आतापर्यंतचे निवडुन आलेले जनप्रतिनिधी व नगरप्रशासन पुर्णता दुर्लक्षित करून त्या भागातील नागरिकांना पावसाळ्यात अतिशय गंभीर परिस्थितीचा धोकादायक सामना करावयास भाग पाडतात, या विनोबा नगर परिसरातील नागरिक नगरपरिषदचे कर नियमित भरतात , परंतु जर नगरप्रशासन नागरिकांना आवश्यक नगरातील सुविधा उपलब्ध करून देऊ शकत नाही , तर नागरिकांनी नगरपरिषद चे कर कां द्यावे असा प्रश्न सुद्धा नागरिकांपुढे निर्माण होत आहे . पूर्वीच्या काळी असं कळते की, एकेकाळी भंडारा रोडाला लागुन पाणी निघण्याकरीता एक नाल्याचे स्वरूप होते , पण आता बहुदा ते नालीत रुपांतर झाले त्यामुळे तर पावसाळ्यात पाणी नालीवरून ओसंडुन बाहेर तर पडत नाही नां? किंवा इतर काय कारण आहेत त्यांचे संशोधन नगर प्रशासनाने करणे अत्यंत गरजेचे आहे , फार लवकरच मान्सुन धडकणार मग पुन्हा तिच परिस्थिती निर्माण होणार या कडे नगरप्रशासनाने गंभीर दखल घेण्याची गरज आहे , पुन्हा जर आगामी पावसाळ्यात अशी परिस्थिती निर्माण झाली तर नागरिकांचा आक्रोश वाढल्यास त्याला सर्वस्वी जवाबदार नगरप्रशासन राहिल, पावसाळ्यात उद्भवणाऱ्या परिस्थितीला थांबविण्याकरीता उपाययोजना करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव
प्रा. कमलाकर निखाडे यांनी केली आहे.