सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी इंदू मिल येथे उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याच्या कामाची केली पाहणी

मुंबई :- राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी आज ज्येष्ठ मूर्तिकार पद्मभूषण पुरस्कार प्राप्त राम सुतार यांच्या गाझियाबाद येथील कार्यशाळेस भेट देऊन मुंबईतील इंदू मिल येथे उभारण्यात येत असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 350 फुट उंच भव्य पुतळ्याच्या कामाची पाहणी करून आढावा घेतला.

यावेळी सुप्रसिद्ध मूर्तिकार सुतार, त्यांचे पुत्र अनिल सुतार, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, उपस्थित होते. सामाजिक न्याय मंत्री शिरसाट यांनी पुतळ्याच्या कामाची गुणवत्ता, प्रगती, इत्यादींचा आढावा घेऊन सुतार आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करून काही महत्वपूर्ण सूचना दिल्या. आज राम सुतार यांचा आज 100 वा वाढदिवस असून या औचित्यांनी शिरसाठ यांच्या उपस्थितीत साजरा केल्याने आनंद द्विगुणीत झाल्याची भावना सुतार यांनी यावेळी व्यक्त केल्या.

तत्पूर्वी महाराष्ट्र सदन येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त छत्रपती शिवाजी राजे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यासमयी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासही पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, विशेष कार्य अधिकारी अभय देशमुख, महाराष्ट्र सदनाच्या व्यवस्थापक भावना मेश्राम उपस्थित होत्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

NVCC का MSEDCL द्वारा वर्ष 2025 से 2030 के लिए प्रस्तावित multi-year tariff petition का पुरजोर विरोध

Thu Feb 20 , 2025
नागपूर :- विदर्भ के 13 लाख व्यापारियों की अग्रणी व शीर्ष संस्था नाग विदर्भ चेंबर द्वारा हमेशा ही व्यापारियों के हितार्थ कार्य करती आ रही है। हाल में MSEDCL द्वारा वर्ष 2025 से 2023 के लिए multi-year tariff petition का MERC के समक्ष प्रस्तावित किया। जिसका चेंबर पुरजोर विरोध करता है। चेंबर के अध्यक्ष अर्जुनदास आहुजा ने कहा कि यदि […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!