नागपूर शहरात सामाजिक सलोखा कायम ठेवावा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

• कायदा व सुव्यवस्था राखण्याकरीता नागरीकांनी सहकार्य करावे :-ॲड. सुलेखाताई कुंभारे, माजी राज्यमंत्री

कामठी – सोमवार दिनांक १७ मार्च रोजी नागपूर शहरातील महाल परीसरात दोन गटामध्ये राडा होऊन मोठ्या प्रमाणात दंगल घडविण्याचा प्रयत्न झाला, ही बाब अत्यंत दुदैवी असून या घटनेवा बहुजन रिपब्लीकन एकता मंच तर्फे निषेध करण्यात येत आहे.

समाजकंटकांनी परिसरातील निष्पाप लोकांच्या गाड्या फोडल्या, दगड फेक करून दहशत निर्माण करून मोठ्या प्रमाणात नुकसान केले. दंगलीला थांबविणारे पोलीसांना सुध्दा समाज कंटकांनी सोडले नाही. त्यामध्ये ३ पोलीस उपायुक्त तसेच ३० च्या वर पोलीस कर्मी जखमी झाले.

भारताच्या मध्यभागी असलेले नागपुर शहराला सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक बळकटी देण्याकरीता व शहराला स्मार्ट सिटी बनविण्याकरीता कटीबध्द असलेले केंद्रिय मंत्री नितीन गडकरी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अथक परिश्रमाला गालबोट लावण्याचे काम करणा-या समाज कंटकाला कडक शासन करण्यात यावे अशी मागणी बहुजन रिपब्लीकन एकता मंचच्या संस्थापिका व माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखा कुभारे यांनी पत्रकाव्दारे केली. तसेच या दंगल घटनेचे कामठी शहरात कुठलेही तीव्र पडसाद न उमटणे हे कामठीकरांचे एक सुजाण नागरिकांची ओळख निर्माण झाली असून कामठीकरानी पुनःश्च शासन व प्रशासनाला कौमी एकतेचा संदेश दिला आहे हे इथं विशेष…

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

रेल परिवहन दक्षता बढ़ाने के लिए पीसीसीएम ने माल परिवहन ग्राहकों के साथ बैठक की

Tue Mar 18 , 2025
नागपूर :- मध्य रेल के प्रधान मुख्य वाणिज्यिक प्रबंधक (PCCM) ने 11 और 12 मार्च को प्रमुख माल परिवहन ग्राहकों के साथ दो दिवसीय बैठक की, जिसमें रेल परिवहन की दक्षता, प्रतिस्पर्धात्मकता और सुविधा बढ़ाने की रणनीतियों पर चर्चा की गई। इस बैठक में माल लदान बढ़ाने, लॉजिस्टिक्स के अनुकूलन और बुनियादी ढांचे को सुदृढ़ करने पर विशेष ध्यान दिया […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!