आतापर्यंत श्रीगणेशाच्या ७१७७ मूर्तींचे विसर्जन 

– ३.२२ टक्के मूर्ती पीओपीच्या तर ९६ टक्के मातीच्या

नागपूर :- सोमवारी २५ सप्टेंबर रोजी शहरात सात दिवसांच्या गणपती बाप्पांच्या मूर्तींचे विसर्जन झाले. नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. मनपाद्वारे व्यवस्था करण्यात आलेल्या विसर्जन टँकमध्ये आतापर्यंत एकूण ७१७७ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. विसर्जीत झालेल्या श्रीगणेशांच्या मूर्तींमध्ये पीओपीच्या मूर्तींचे प्रमाण हे ३.२२ टक्के असून मातीच्या मूर्ती विसर्जनाचे प्रमाण ९६.७८ टक्के एवढे आहे.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनात शहरातील सर्व विसर्जन स्थळे व्यवस्थित कार्यरत आहेत. बुधवार २७ सप्टेंबरपासून ९, १० आणि ११ दिवसांच्या श्रीगणेशाच्या मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. त्यादृष्टीने देखील मनपाची सर्व तयारी पूर्ण झालेली असून ४ फुटापर्यंतच्या मूर्ती शहर हद्दीमधील कृत्रिम विसर्जन टँकमध्ये तर ४ फुटापेक्षा मोठ्या आकाराच्या मूर्तींचे विसर्जन कोराडी येथील कृत्रिम तलावामध्ये करण्यात येणार आहे. कोराडी येथील विसर्जन स्थळी देखील सर्व व्यवस्था पूर्णत्वास आलेली आहे. नागरिकांनी शांततापूर्ण रितीने सर्व विसर्जनस्थळी श्रीगणेशाच्या मूर्तींचे विसर्जन करावे तसेच निर्माल्य कलशामध्येच श्रीगणेशाचे निर्माल्य जमा करावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.

बुधवारी २० सप्टेंबर रोजी दीड दिवसांच्या श्रीगणेशाच्या विसर्जनापासून शहरात मूर्ती विसर्जनाला सुरूवात झाला. यानंतर तीन दिवस, पाच दिवस आणि सात दिवसांच्या श्रीगणेशाच्या मूर्तींचे विविध ठिकाणी विसर्जन करण्यात आले. आतापर्यंत झालेल्या विसर्जनानुसार दीड दिवसांच्या श्रीगणेशाच्या १२७४ मूर्तींचे, तीन दिवसांच्या श्रीगणेशाच्या ९१२ मूर्तींचे, पाच दिवसांच्या श्रीगणेशाच्या २५७९ मूर्तींचे आणि सात दिवसांच्या श्रीगणेशाच्या २४१२ मूर्तींचे विसर्जन झाले. एकूणच आतापर्यंत एकूण ७१७७ मूर्तींचे विसर्जन झालेले असून यामध्ये ६९४६ मूर्ती मातीच्या तर २३१ मूर्ती पीओपीच्या आढळून आलेल्या आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

केंद्रीय एकीकृत कीड व्यवस्थापन केंद्र नागपूर क्षेत्रीय कार्यालयाद्वारे कापसावर एकीकृत कीड व्यवस्थापनावर 1 महिन्याचे दीर्घकालीन राज्यस्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन

Wed Sep 27 , 2023
नागपूर :- केंद्रीय एकीकृत कीड व्यवस्थापनकेंद्र नागपूर क्षेत्रीय कार्यालयाद्वारे महाराष्ट्रातील 40 कृषी अधिकाऱ्यांसाठी कापुस पिकाच्या एकीकृत कीड व्यवस्थापनावर 1 महिन्याचे दीर्घकालीन प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्‌घाटन 27 सप्टेंबर बुधवार रोजी सकाळी 10.30 वाजता होणार असून याप्रसंगी नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर हे उद्घाटक म्हणून उपस्थित राहतील. त्याचप्रमाणे वनस्पती संरक्षण विभाग फरीदाबादचे सल्लागार डॉ. जे पीसिंग, केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूरचे संचालक डॉ. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com