नागपूर :- बसपाच्या राष्ट्रीय नेत्या व भावी प्रधानमंत्री बहन कुमारी मायावती आज गुरुवार 11 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती समारोह निमित्त नागपुरात होणाऱ्या भव्य निवडणूक जाहीर सभेला उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी बहन मायावती सोबत बसपाचे राष्ट्रीय कॉर्डिनेटर व महाराष्ट्र प्रदेशचे मुख्य प्रभारी खासदार रामजी गौतम, दुसरे प्रभारी नितीनजी सिंग, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष एडवोकेट परमेश्वर गोणारे प्रामुख्याने उपस्थित राहुन मार्गदर्शन करतील अशी माहिती बसपाचे प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी दिली.
बहुजन समाज पार्टी ने 2024 च्या सात टप्प्यात होणाऱ्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 48 लोकसभा उमेदवार स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. बहुतेक उमेदवार निश्चितही झालेले आहेत. त्यांच्या निवडणूक प्रचारार्थ बहन मायावतीजी या महाराष्ट्रात येत असून त्यांची पहिली सभा ही उत्तर नागपुरातील बेझनबाग येथे आहे. या सभेला बसपाचे सर्व लोकसभा उमेदवार, नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील.
बसपा ने नागपूर -योगेश लांजेवार, रामटेक -संदीप मेश्राम, भंडारा-गोंदिया -संजय कुंभलकर, गडचिरोली-चिमूर -प्रा योगेश गोन्नाडे, चंद्रपूर -राजेंद्र रामटेके, बुलढाणा -गौतम मघाडे, अकोला -काशिनाथ धामोडे, अमरावती ऍड -संजय गाडगे, वर्धा -डॉ मोहन राईकवार, यवतमाळ-वाशिम -हरिसिंग राठोड, हिंगोली -गजानन डाळ, नांदेड -पांडुरंग अडगुळवार, परभणी -आलमगीर खान आदी उमेदवार 19 एप्रिल व 26 एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीत बसपा च्या हत्तीवर स्वार आहेत.
संविधानाच्या रक्षणासाठी व बहन कुमारी मायावती ह्यांना प्रधानमंत्री बनविण्यासाठी बसपाच्या हत्तीवर स्वार असणाऱ्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करणे जरुरी असल्याने आपण बहनजिंच्या या सभेला यशस्वी करून आपल्या विजयाचा रथ पुढे नेण्यासाठी फुले शाहू आंबेडकरी विचारावर विश्वास असलेल्यांनी, संविधान प्रिय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक व सर्वसामान्य मतदारांनी सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन बसपाचे प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी केले