कोदामेंढी :- कोदामेंढी पंचायत समिती सर्कल अंतर्गत येणाऱ्या गट ग्रामपंचायत सिरसोली चे सरपंच विनोद कारेमोरे यांनी शासनाच्या निर्देशाप्रमाणे गाव हिरवेगार व जलयुक्त असण्यासाठी व उन्हाळ्यात पाण्याची टंचाई पासून मुक्तता मिळवण्यासाठी त्यांच्या गावा परिसरातून वाहणाऱ्या सूर नदी पात्रातून अवैध रेती उत्खनन वर बंदी आणली असून, कोदामेंढीचा घोटाळेबाज सरपंच आशिष बावनकुळे स्वतःच सावंगी घाटावरील त्याच्या मालकीच्या शेता समोर असलेल्या नदीकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात नरेगा अंतर्गत लावलेली झाडे व सावंगी येथील माजी सरपंच दिवंगत कृष्णमूर्ती परचुरी यांनी नदीकिनाऱ्यावर लावलेली झाडे जेसीबी मशीन ने उपडून अवैध उत्खनन करत आहे व जलयुक्त व हिरवेगार असणारा नदी किनारा परिसर वाळवंटात रूपांतर करत आहे.
तरी प्रशासन कुंभकर्ण झोप घेत असून, जिल्हाधिकारी विपिन इटणकर यांच्याकडे या घोटाळेबाज सरपंच आशिष बावनकुळे ची ऑनलाईन तक्रार करूनही ,अजूनही, बातमीलिहीपर्यंत चौकशी करून पदमुक्त करण्याचे पत्र मिळाले नसल्याचे आज मंगळवार 15 ऑक्टोबरला पंचायत समितीचे पंचायत विस्तार अधिकारी शरद दोनोडे यांनी भ्रमणध्वनी वरून सांगितले. तर जिल्हाधिकारी विपीण इटणकर यांना भ्रमणध्वनी केले असता त्यांनीही प्रतिसाद दिला नाही.
त्यामुळे संबंधित प्रशासनवर्ग घोटाळेबाज रेती माफिया सरपंच आशिष बावनकुळे यांना पाठीशी तर घालत नाही ना? असा सवाल येथील, परिसरातील व मौदा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांना पडला आहे.