मौन ही एक उपचार पध्दती आहे – डॉ. सूर्यकांत पाटील

– विद्यापीठात विद्यार्थी प्रेरणा कार्यक्रम संपन्न

अमरावती :- मौन ही एक उपचार पध्दती असल्याचे प्रतिपादन डॉ. सूर्यकांत पाटील यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील आजीवन अध्ययन विस्तार विभागाच्या पदव्युत्तर पदविका निसर्गोपचार व योगशास्त्र व पदव्युत्तर पदविका योगा थेरपी अभ्यासक्रमाच्या विद्याथ्र्यांंकरीता विद्यार्थी प्रेरणा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील होते.

पुढे बोलतांना डॉ. सूर्यकांत पाटील म्हणाले, भारतीयांची जीवन जगण्याची पद्धती ही विदेशी शास्त्रज्ञांनी चिकित्सेच्या रूपाने भारतीयांपुढेच मांडली आहे, ती जीवन जगण्याची जुनीच भारतीय पद्धत अवलंबवावी, कारण आधुनिक जीवनशैली आपल्याला फक्त रोगी बनवते असे सांगून त्यांनी अनेक दाखले देत विद्याथ्र्यांना योग व निसर्गोपचाराकडे वळावे असे आवाहन केले.

अध्यक्षीय भाषणातून डॉ. श्रीकांत पाटील यांनी विद्याथ्र्यांना दैनंदिन जीवनातील निसर्गोपचार व योगाचे महत्त्व व फायदे पटवून दिले. निसर्गोपचार व योगा थेरपी हे दोन्ही अभ्यासक्रम कौशल्याभिमुख असल्याने ते नियमित अभ्यासाने साध्य करावे असे आवाहन केले. मान्यवरांच्या हस्ते संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून महाराष्ट्र गीत व विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक प्रा. आदित्य पुंड यांनी, संचालन प्रा. राधिका खडके, तर आभार डॉ. अश्विनी राऊत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता डॉ. रणजीत बसवनाथे, प्रा. राहुल दोडके, प्रा.संदीप महल्ले, प्रा. प्रफुल्ल गांजरे यांनी परिश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मौदा तहसील की बदहाल नहर

Thu Sep 14 , 2023
– जिला परिषद,जिलाधिकारी कार्यालय सह उपविभागीय अधिकारी व तहसीलदार सुस्त कोदामेढ़ी :- नागपुर जिले के कामठी-कोराडी-मौदा विधानसभा क्षेत्र के अंतिम छोर पर कोदामेढ़ी गांव है। इस गांव से लगी नहरों की हालत बद से बदतर हो चुकी है। नहरों की लंबाई कई किलोमीटर की है,नहरों का आंतरिक भाग का पक्कीकरण धस चुका है। नहरों में घास रूपी जंगल ने अपने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com