तीर्थक्षेत्र रामधाम मनसर येथे भारतातील पहिले सुवी बर्ड पार्क चे शुभारंभ होणार ! 

सुवि बर्ड पार्कच्या माध्यमातून युवकांना रोजगार मिळणार – 
रामधाम चे संस्थापक,पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे..
रामटेक :- विदर्भातील प्रसिद्ध रामधाम तीर्थक्षेत्र मनसर , रामटेक  चे  प्रणेते पर्यटक मित्र श्री चंद्रपाल चौकसे यांचा संकल्पनेतून रामधामची निर्मिती केली यामध्ये जगातील सर्वात मोठा ओम,ओम  ची निर्मिती केली या ओमची लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद  आहे. रामधाम येथे  वैष्णवी देवीच्या मंदिराची निर्मिती केली. बर्फानी महाराज यांचे प्रसिद्ध शिवलिंग ची निर्मिती करण्यात आली. रामधाम मध्ये पर्यटकाना लंडन बस व ट्रेन चा आनंद घेता येतो तसेच निसर्गरम्य असे ऍग्रो पार्क ची निर्मिती केली आहे मुलांकरिता सर्व प्रकारचे झूल्यांचा आनंद घेता येतो रामधाम मध्ये पर्यटकांना दिवस भर आनंद घेता येतो अश्या या निसर्गरम्य वातावरनात  लवकरच पर्यटकांकरिता सुवी बर्ड पार्क सुरु होणार आहे, या बर्ड पार्क मध्ये विविध प्रकारचे विदेशी पक्षी ठेवण्यात येणार आहे त्यामुळे रामधाम येथे भेट देणाऱ्या पर्यटकांना व भक्तांना विविध प्रकारचे पक्षी बघायला मिळणार आहे त्यामुळे पर्यटकांचे मनोरंजन होईलच पण या बर्ड पार्क मुळे रामटेक तालुक्याचे नाव  भारतात प्रसिद्ध होणार आहे तसेच स्थानिक युवकांना रोजगार ची संधी प्राप्त होणार आहे. या बर्ड पार्क करिता लागणारे आवश्यक परवानगी संबधीत कार्यालयाकडून घेण्यात आल्या आहे व पर्यटक मित्र  चंद्रपाल चौकसे यांच्या पुढाकाराने येत्या काही दिवसात लवकरच पहिले सुवी बर्ड पार्क पर्यटकांसाठी खुले होणार आहेत अशी माहिती रामधाम चे संस्थापक पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांनी पत्रकार परिषदेत
सांगितले ..
यावेळी पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे संध्याताई चौकसे,गौरव चौकसे, गुंजन चौकसे,शिवकुमार पदमाकर ,मोहन कोठेकर, सरगम बागडे,उमाकांत टेंभरे व पत्रकार मंडळी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

Infrastructure projects worth Rs. 7 Lakh crore planned by Road Transport Ministry in the next 2-3 years

Sat Dec 18 , 2021
Internal Rate of Return in Road sector high. Keep your confidence 110% – Nitin Gadkari Conference focuses on Bharatmala Highway Development projects, asset monetization and vehicle scrapping policy   Mumbai – Union Minister for Road Transport & Highways (MoRTH)  Shri Nitin Gadkari  has urged investors to come forward and invest boldly in the infrastructure sector, which offers a diverse array […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com