मुंबईत धक्कादायक निकाल, उज्वल निकम पराभूत

उत्तर मध्य मुंबईत प्रसिद्ध वकिल उज्वल निकम आणि वर्षा गायकवाड यांच्यात सामना आहे. भाजपाने या मतदारसंघातून पूनम महाजन यांचा पत्ता कापला व त्यांच्याजागी उज्वल निकम यांना उमेदवारी दिली. भाजपाने अखेरच्या क्षणी उज्वल निकम यांना उमेदवार बनवलं. महाविकास आघाडीत काँग्रेसकडे हा मतदारसंघ आला. काँग्रेसने इथून धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली. मागच्या दोन टर्मपासून उत्तर मध्य मुंबईच्या मतदारांनी पूनम महाजन यांना साथ दिली होती. यावेळी उत्तर मध्य मुंबईत 51.98 टक्के मतदान झालं. 2019 मध्ये इथे 53 टक्के मतदान झालं होतं.

उत्तर मध्य मुंबईतून भाजपाचे उज्वल निकम हे पराभूत झाले आहेत. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विजयी झाल्या आहेत. सुरुवातीला उज्वल निकम यांच्याकडे मोठी आघाडी होती. 

उत्तर मध्य मुंबईत वांद्रे पूर्वेचा मध्यमवर्गीय झोपडपट्टीधारक मतदार आहे. त्याचवेळी वांद्रे पश्चिमेचा हाय प्रोफाइल मतदार सुद्धा आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी या भागात राहतात. 17 लाखापेक्षा जास्त मतदार या मतदारसंघात आहेत. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात मराठी मतदारांबरोबरच दलित आणि उत्तर भारतीय मतदार मोठ्या संख्येने आहेत. मुस्लिम मतदारांचही प्राबल्य आहे. उत्तर भारतीय मतदार कोणाच्या बाजूने जाणार? त्यावरही जय-पराजयाच गणित ठरणार आहे.

Source by loksatta
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राम मंदिराचा मुद्दा गाजला त्याच अयोध्येत भाजपला पराभवाचा धक्का

Tue Jun 4 , 2024
लोकसभा निवडणुकीचे निकाल आता हळूहळू स्पष्ट होत आहे. जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये एनडीएला 300 ते 350 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता. भाजपला पुन्हा एकदा बहुमत मिळेल अशी शक्यता वर्तवली गेली होती. पण आता भाजपला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे 10 वर्षांनंतर देशात पुन्हा एकदा इतर पक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन करावे लागणार आहे. 2024 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com