संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष कन्हान व्दारे साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ वी जयंती निमित्त संताजी नगर कांद्री येथे लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण व पुजा अर्चना करून जयघोष करून जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख लोकेश बावनकर, कामगार सेना जिला प्रमुख समीर मेश्राम, कन्हान शहर प्रमुख प्रभाकर बावणे, टेकाङी सर्कल प्रमुख जितेंद्र जंबे, उपतालुका प्रमुख नरेंद्र खङसे, श्रीकृष्ण उके, राजन मनगटे, वाहतुक सेना प्रमुख सावन लोंढे, कांद्री शाखा प्रमुख सुरेश आंबिलङुके, पुंडलिक नागपुरे, विरेंद्र खङसे, अजित कांबळे, महेश बावनकुळे, कुणाल कापसे, ओजस कुंभलकर सह शिवसैनिक उपस्थित होते.