दक्षिण नागपुरातील दत्तात्रय नगरातील नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष शिवसेनेतर्फे नेहरूनगर झोनच्या आयुक्तांना दिले निवेदन

नागपूर :- नेहरूनगर झोनचे सहाय्यक आयुक्त पंधरे यांना प्रभाग क्र. 30 ( बिडीपेठ ) येथील नागरिकांच्या अनेक समस्या बाबतीत बुधवार दिनांक 8 मे २०२४ रोजी, शिवसेने तर्फे निवेदन देण्यात आले. प्रभाग 30 मध्ये काही भागातील चेम्बर वर झाकण तुटलेले आहेत. अचानक अवकाळी पावसाच्या पाण्याने लाईनचे चेम्बर भरलेले आहेत. नळाला गढुळ पाणी येत आहेत. दत्तात्रय नगर मधील दोन लोकांना डेंग्यू सारखा आजार झालेला आहेत. जागोजागी कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहेत. आठ आठ दिवस झाडु वाले येत नाही. अश्या कितेक समस्या आहे.

सिध्दुजी कोमजवार माथाडी कामगार सेना नागपूर शहर अध्यक्ष यांच्यावतीने निवेदन देण्यात आले. त्यावेळी उपस्थित विलास मठकर, अशोक पौनीकर, अरुण कुकडे, रविन्द्र बोरकुटे, हिमांशू सहारे, गजानन कोकुडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बालकांच्या संपूर्ण लसीकरणासाठी समन्वयाने कार्य करा

Sun May 12 , 2024
– नियमित लसीकरण टास्क फोर्स समितीची बैठक नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील मनपा रुग्णालय, शासकीय व खासगी दवाखान्यांमध्ये होणाऱ्या नियमित लसीकरण संदर्भात बुधवार (ता.०८) रोजी टास्क फोर्स समितीची बैठक पार पडली. मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात झालेल्या बैठकीत कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये तसेच वंचित बालकांची यादी तयार करून पुढील महिन्यांत त्यांचे लसीकरण होईल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com