मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पुन्हा भाजपवर हल्लाबोल केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त संवाद साधताना त्यांनी पुन्हा शिवसेनेची 25 वर्ष भाजपसोबत युतीत सडलो असा पुनरुच्चार केला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, “शिवसेनेची गेली 25 वर्ष भाजप सोबत युती होती. आपली 25 वर्ष युतीमध्ये सडली. माझं आजही तेच मत आहे. मी माझ्या मतावर ठाम आहे. बाळासाहेब म्हणायचे की राजकारण हे गजकर्णासारखं आहे, जेवढं खाजवावं तेवढी अधिक खाज येतं. तसे हे सगळे गजकर्णी, म्हणजे राजकारणातले, नाहीतर पुन्हा एकदा मथळा यायचा की मी त्यांना गजकर्णी म्हटलं. मी त्यांना राजकारणाचं गजकरण आहे, म्हणून मी बोलतोय, असा टोलाही त्यांनी लगावला. बाळासाहेबांचं दिल्ली काबीज करण्याचं स्वप्न येत्या काळात पूर्ण करणार, असा दावाही उद्धव ठाकरे यांनी केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, यांना हिंदुत्वासाठी सत्ता हवी होती. वाघाचं कातडं पांघरलेली शेळी असते तसं यांनी हिंदुत्वाचं कातडं पांघरलं आहे. आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. आम्ही हिंदुत्वापासून कदापि दूर जाऊ शकत नाही. आम्ही भाजपला सोडलं, हिंदुत्वाला सोडलेलं नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. बाबरी मशीद पडल्यानंतर देशात शिवसेनेची लाट होती. बाबरी मशीद पडल्यानंतर शिवसेनेनं सिमोल्लंघन केलं असतं तर आज आपला पंतप्रधान असता, असंही ते म्हणाले.
आपण शिवसेनेची लाट का आणू शकत नाही?