शिंदे-भाजप सरकार पडणार? संजय राऊत यांचा मोठा दावा 

नवी दिल्ली :-शिंदे भाजप सरकार पडणार, लवकरच मध्यावधी निवडणुका लागणार असल्याचे संकेत महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी दिले आहेत. मात्र खुद्द भाजपचे मंत्री रावसाहेब दानवे यांनीही राज्यातील स्थिती गोंधळलेली असल्याचं म्हटलं. त्यामुळे रावसाहेब दानवे कधी कधी खरंही बोलून जातात. हे मध्यावधीचे संकेत समजावेत. शिंदे-भाजप सरकार 100 टक्के पडणार असा दावा संजय राऊत यांनी केलाय.

दानवे काय म्हणाले ?

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील सिरजगाव येथील एका प्रकल्पाच्या शुभारंभ प्रसंगी रावसाहेब दानवे बोलत होते. ते म्हणाले, ‘ महाविकास आघाडीचे सरकार जाईल असे कुणालाही वाटत नव्हते. मात्र अशी जादू झाली की अडीच वर्षात सरकार कोसळले. यामुळे उद्या नेमकी राजकीय परिस्थिती काय असेल याचा अंदाज बांधता येत नाही.

सध्याची राजकीय परिस्थिती गोंधळलेली आहे. कधी काय होईल याचा नेम नाही. त्यामुळे जनतेची कामे करा, असा सल्ला रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिला.

त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, रावसाहेब दानवे कधी कधी खरं बोलून दाखवतात. दोन महिन्यानंतर काहीही होऊ शकतं. म्हणजे सरकार पडू शकतं म्हणजेच त्यांनी मध्यवधीचे संकेत दिले आहेत. हे सरकार 100 टक्के पडतंय, याविषयी माझ्याकडे पूर्ण माहिती आणि खात्री आहे, असा दावा संजय राऊतांनी केला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मंत्रिमंडळ विस्तार कधी? शिंदे गटाच्या आमदाराने दिली महत्त्वाची माहिती ! 

Tue Nov 22 , 2022
मुंबई :- राज्याला बहुप्रतिक्षीत अशा मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल, याचं उत्तर मिळालंय. हिवाळी अधिवेशनापूर्वी  मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा पार पडेल, अशी माहिती एकनाथ शिंदे गटाचे आमदार आशिष जैस्वाल यांनी दिली आहे. त्यानंतर सर्वच चर्चांना विराम मिळेल, असं वक्तव्य जैस्वाल यांनी केलंय. एकनाथ शिंदे गट तसेच भाजपातील आमदारांपैकी अनेक इच्छुक कॅबिनेटच्या विस्ताराकडे डोळे लावून बसले आहेत. विशेषतः शिंदे गटातील आमदारांची अस्वस्थता […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com