शेगाव ते पंढरपूर पालखी मार्गाची तत्काळ दुरूस्ती करावी – सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे

मुंबई :- शेगाव ते पंढरपूर पालखी महामार्गावर ठिकठिकाणी तडे गेल्यामुळे या रस्त्याची तत्काळ दुरूस्ती करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

मंत्रालयात आज शेगाव ते पंढरपूर महामार्गाच्या दुरूस्तीबाबत झालेल्या आढावा बैठकीत मंत्री भुसे बोलत होते. यावेळी आमदार संजय रायमुलकर, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अ. ब. गायकवाड, मुख्य अभियंता एस. के. सुरवसे, सह व्यवस्थापकीय संचालक कैलास जाधव, व्यवस्थापक दत्तप्रसाद नडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री भुसे म्हणाले, या पालखी मार्गाच्या दुरूस्तीचे काम ज्या कंपनीने अपूर्ण ठेवले आहे, त्या कंपनीच्या अनामत रकमेतून उर्वरित कामे पूर्ण करण्यात यावीत. तसेच संबंधित कंपनीवर आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही यावेळी मंत्री भुसे यांनी दिल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दांगट समितीचा अहवाल तत्वत: स्वीकारण्यात येणार - महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Wed Sep 4 , 2024
मुंबई :- महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यात सुधारणा सुचविण्याबाबत नेमण्यात आलेल्या दांगट समितीचा अहवाल तत्वत: स्वीकारण्यात येणार असल्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. मंत्रालयात झालेल्या महसूल कायदा सुधारणा समितीच्या बैठकीवेळी महसूल मंत्री विखे पाटील बोलत होते. बैठकीस समितीचे अध्यक्ष उमाकांत दांगट, सदस्य शेखर गायकवाड दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. तसेच महसूल विभागाचे सहसचिव […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com