शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणावरील लागलेला कलंक भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ऍड. धर्मपाल मेश्राम यांचा घणाघात

नागपूर :- देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांचे महाराष्ट्रातील जनतेने ओझे वाहिल्याचे विधान केले. ही बाब पूर्णतः समर्थनीय असल्याचे सांगत शरद पवार हे महाराष्ट्रातील राजकारण व 12 कोटी जनतेला लागलेला कलंक आहेत, अशी टिका भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी पत्रकार परिषदेत केली.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रवक्ते माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केलेल्या टिकेचा ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी पत्रकार परिषदेत चांगलाच समाचार घेतला. शुक्रवारी (ता. 8) धंतोली येथील टिळक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत भाजपा प्रवक्ते  चंदन गोसावी, महामंत्री रामभाऊ आंबुलकर, माजी नगरसेवक सुनील हिरणवार उपस्थित होते.

शरद पवार हे देशाला सर्वाधिक काळ लाभलेले कृषिमंत्री आहेत. 2004 ते 2014 या दहा वर्षाच्या कृषिमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी एकही शेतकरी हिताचे कार्य केले नसल्याचा आरोप ऍड. मेश्राम यांनी केला. वेदप्रकाश आर्य यांनी पवारांनी 72 हजार कोटींची कर्जमाफी केळ्याचे विधान केले. आर्य यांच्या विधानाचा समाचार घेताना ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी ते 72 हजार कोटी शेतकऱ्यांना मिळाले नसून शरद पवारांच्या अधिपत्याखालील मृतावस्थेत असलेल्या सहकारी बँकांना पुनर्जीवित करण्यासाठी वापरले गेल्याचा घणाघात केला. 1993 मध्ये तत्कालीन मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त गो. रा. खैरनार यांनी शरद पवारांचे संबंध दहशतवादी दाऊद इब्राहिम यांच्यासोबत असून त्यांनी सुधाकरराव नाईक यांना खुर्चीवरून खेचण्यासाठी मुंबईत दंगल घडविल्याचा आरोप केला. याउपर मुंबईचे तत्कालीन डीजीपी उल्हास जोशी यांनी शरद पवारांचे संबंध थेट दहशतवादी दाऊद इब्राहिम, हितेंद्र ठाकूर आणि पप्पू कलानी यांच्यासोबत असल्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात पुराव्यासह शपथपत्र दाखल केले. गुन्हेगारी प्रवृत्तींना हाताशी घेऊन आपले राजकारण साधून घेण्याचे काम मागील 50 वर्षात शरद पवारांनी केल्याचा देखील आरोप ऍड. मेश्राम यांनी केला.

1990 दशकाच्या उत्तरार्धात आपले राजकीय गुरु यशवंतराव चव्हाण यांच्या पाठीत खंजीर खुपसून आमदार फोडून स्वतः मुख्यमंत्री झाले. 23 नोव्हेंबर 1994 ला गोरगरीब गोवारी बांधवांच्या आंदोलनावर अमानुष गोळीबार करून 114 गोवारी बांधवांचे हत्याकांड घडले. मुख्यमंत्री असताना गोवारी बांधवांच्या आंदोलनाची साधी दखल घेण्याची तसदी न घेणारे शरद पवार 114 गोवारी बांधवांच्या हत्येस जबाबदार असल्याची देखील टीका ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी केली.

विश्वासघातकी, भ्रष्टाचारी, परिवारवादी, गुन्हेगारी प्रवृत्तीला हाताशी धरून स्वतःचा राजकीय स्वार्थ साधणाऱ्या शरद पवार यांची बाजू मांडताना त्यांचे प्रवक्ते देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचेबद्दल बेताल वक्तव्य करत असतील तर भाजपा सहन करणार नाही, असा इशारा प्रदेश उपाध्यक्ष ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी दिला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भाजप महिला आघाडीने सुरू केली नागपुरातील महिलांसाठी हॅल्लो यशस्विनी' हेल्पलाईन

Sat Mar 9 , 2024
– ना. गडकरी, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण – महिला आघाडी अध्यक्ष प्रगती पाटील ची संकल्पना नागपूर :- नागपुरातील महिलांना उद्योग, शिक्षण, आरोग्य आणि कायदेविषयक मार्गदर्शन मिळावे या हेतूने भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने ‘हॅलो यशस्विनी’ या हेल्पलाईनचे ( *9545759966* ) लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार विकास ठाकरे, आमदार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com