नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये 400 मीटर अंतराच्या शर्यतीमध्ये अॅथलेटिक्स क्लब अमरावतीचा शंकर जराड ने तसेच महिलांच्या भालाफेक स्पर्धेत माधव स्पोर्टींगच्या अंकिता भोयरने सुवर्ण पदक पटकावले.
विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथील सिंथेटिक ट्रॅकवर ही स्पर्धा सुरु आहे.
गुरुवारी (ता.16) 400 मीटर अंतराच्या शर्यतीमध्ये शंकर जराडने 49.02 सेकंदात निर्धारित अंतर पार करून पहिले स्थान पटकावले. हर्ष सिंग-खेल फाऊंडेशन नागपूर (४९.२४) दुसऱ्या आणि प्रतीक कानेरे नवमहाराष्ट्र क्रीडा (५०.३९) तिसऱ्या स्थानी राहिले.
महिलांच्या भाला फेक स्पर्धेत अंकिता भोयर ने २५.१६ मीटर सह सुवर्ण पदकावर नाव कोरले. आरएस मुंडले इंग्रजी शाळाची रेणुका मोहरीर (२४.७९ मी.) दुसऱ्या आणि पीआरडी स्पोर्ट्स ब्रह्मपूरीची सानिया योगीराज (१८.९३ मी.) तिसऱ्या स्थानावर राहिली.
निकाल (प्रथम, द्वितीय, तृतीय)
भालाफेक १४ वर्षाखालील मुले
सौम्य निकोडे (ट्रॅक स्टार ॲथलेटिक्स), अश्विन ठाकरे (लक्षमेध फाऊंडेशन), हर्ष ढोबळे (आई फाऊंडेशन).
लांब उडी महिला
स्वाती उके- वॉरियर्स स्पोर्ट्स अकादमी (५.२१ मी.) , सानिका मांगर-बीकेसीपी (४.७८मी.), अनुष्का बोदीले-एचटीकेबीएस हिंगणा (4.65 मी.)
६०० मीटर दौड
महिला (१४ वर्षाखालील वयोगट)
अनन्या मांगर (बीकेसीपी), नव्या चितडे (एकलव्य ऍथलेटिक्स सीएल), ज्योती प्रसाद (बीबीएफ)
ट्रिपल जंम्प
पुरुष (१८ वर्षाखालील वयोगट )
क्रिश वरथे -वॉरियर्स स्पोर्ट्स अकादमी (१२.९७ मी.), क्रिष्णा रोहाने-टीम (१२. ६२ मी.), रेहान पटाईत- क्रीडा प्रबोधिनी (११.४ मी.)
भालाफेक महिला (खुला गट)
अंकिता भोयर- माधव स्पोर्टींग केइएलव्ही (२५.१६ मी.), रेणुका मोहरीर- आरएस मुंडले इंग्रजी शाळा (२४.७९ मी.), योगीराज सानिया – पीआरडी स्पोर्ट्स ब्रह्मपूरी (१८.९३ मी.)
थाळी फेक महिला ( १६ वर्षाखालील वयोगट )
सोनाली कोलते – वॉरिअर्स स्पोर्ट्स अकॅडमी (२७. ७५ मी.), संकल्पना मेश्राम – वॉरिअर्स स्पोर्ट्स अकॅडमी (२५. ९४ मी.), अनुष्का गुट्टे – एकलव्य ऍथलेटिक्स (२३. ८५ मी.)
४०० मीटर दौड पुरुष (खुला गट)
शंकर जराड- ऍथलेटिक्स क्लब अमरावती- (४९.०२), हर्ष सिंग-खेल फाऊंडेशन नागपूर (४९.२४), प्रतीक कानेरे – नवमहाराष्ट्र (५०.३९)
४०० मीटर दौड १८ वर्षाखालील गट
दर्शन तिवाडे – टीम (५०.७
१), ऋग्वेद आंबे -क्रीडा प्रबोधिनी (५०.७५), हर्ष उपाध्याय -फ्युचर ऍथलेटिक्स (५२. ११)