नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील वुशू स्पर्धेमध्ये शाहु गार्डन इंग्लिश स्कूल ने विजेतेपद पटकाविले. लोहारा मैदान वर्धमान नगर येथे ही स्पर्धा पार पडली.
१४ वर्षाखालील मुले आणि मुलींमध्ये शाहु गार्डन इंग्लिश स्कूल ने विजेतेपद पटकाविले. स्पर्धेत प्रियांती इंग्लिश स्कूल अँड ज्यूनिअर कॉलेज संघाने उपविजेतेपद प्राप्त केले. गुरुकूल स्पोर्ट्स वुशू अकादमीला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
स्पर्धेमध्ये वॉरिअर्स स्पोर्ट्स क्लब, आर्मी पब्लिक स्कूल, सेवादल क्रीडा मंडळ, राणी दुर्गावती, सिक्रेट स्पोर्ट्स अकादमी, एस.पी. पब्लिक स्कूल, सेंट एम.बी. हायस्कूल, श्री. गजानन इंग्लिश स्कूल या चमूंमधील एकूण ७०० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता.
स्पर्धेतील विजेत्यांना खासदार क्रीडा महोत्सवाच्या संयोजक चेतना टांक व निमंत्रक अशफाक शेख यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी नागपूर वुशू असोसिएशनचे सचिव दीपक बिेसेन, चंद्रशेखर ढबाले, सुमीत नागदवने उपस्थित होते.