संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- तेजस बहुउद्देशीय संस्था गेली सहा वर्षे राष्ट्रीय संत गाडगे बाबा महाराज यांची दहा कलमी कार्ये पार पाडण्यासाठी कार्यरत आहे. २३ फेब्रुवारी २००४ रोजी संत गाडगे बाबा जयंतीनिमित्त शास्त्री चौक, कामठी येथील संस्थेच्या कार्यालयात दुपारी ४ वाजता पूजनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.
राष्ट्रीय संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्ताने तेजस बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर अर्गुलेवार यांच्या हस्ते सांस्कृतिक, सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहणारे शाहीर राजेंद्र भीमराव बावनकुळे, अध्यक्ष भारतीय कलाकार शाहीर मंडळ ऑल इंडिया यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ स्मुर्ती चिन्ह देवून सत्कार करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील चोखारे, प्रमुख पाहुणे पर्यटक मित्र मनसर चंद्रपाल चौकसे, कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे महेंद्र भुटाने तसेच प्रमुख पाहुणे गोविंद पोद्दार, जब्बार, चंद्रशेखर अरगुलेवार, देविदास पेटारे, रोहन खोब्रागडे – व इतर मान्यवर उपस्थित होते. पूजेनंतर कामठी रेल्वे स्थानकाजवळील अनाथआश्रमातील अनाथ मुलांना फळ वितरण करण्यात आले नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.