लाखनी भंडारा येथे शाहीर राजेंद्र बावनकुळे यांचा सत्कार.

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी : लाखनी,भंडारा येथे राष्ट्रीय अमर कला निकेतन अंतर्गत गुरुवंदन विदर्भस्तरीय लोककला महोत्सव,28 आणि 29 ऑगस्टला आयोजित कार्यक्रमात ,संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ लोकशाहिर अंबादास नागदेवे,आणि संजय वनवे सर,युवा शाहिर आर्यन नागदेवे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शाहिर राजेंद्र भीमराव बावनकुळे, (आकाशवाणी, कॅसेट सिंगर )यांचे शाल श्रीफळ,समूर्ती चिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले,यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक ,प्रमुख पाहुणे ज्येष्ठ शाहीर श्रीराम मेश्राम, तीतूरवlले,ज्येष्ठ शाहीर माणिकराव देशमुख, शाहिर पुरुषोत्तम खांडेकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सत्कार करण्यात आले,यावेळी शाहिर अरुण मेश्राम, अध्यक्ष महाराष्ट्र शाहिर परिषद, रामटेक तालुका, शाहीर भगवान लांजेवार अध्यक्ष महाराष्ट्र शाहीर परिषद, पारसीवनीं तालुका,शाहिर चिरकूट पुनडेकर, शा गजानन वडे, शा विरेन्द्र सिंह शेंगर,शा शिशुपाल अतकरे,शा विक्रम वांढरे ,भुपेश बावनकुळे,शा वासुदेव नेवारे,शा रवींद्र मेश्राम,शा प्रदीप कडबे,युवराज अडकणे,शा रमेश रामटेके ,दर्शन मेश्राम,शा शालीक शेंडे,प्रफुल भणारे,गिरीधर बावणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सत्कार करण्यात आले.यावेळी कार्यक्रमlमध्ये मोठ्या संख्येने शाहिर कलाकार उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा.

Tue Aug 30 , 2022
मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाच्या कृपेने गेल्या दोन वर्षातले कोरोना संकटाचे मळभही आता दूर झाले आहेत. त्यामुळे यंदा आपण गणरायाचे उत्साहात, जल्लोषात आणि निर्बंधमुक्त वातावरणात स्वागत करत आहोत. गणरायाचे आगमन आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि समाधान घेऊन येवो याशब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘लाडक्या गणरायाचे स्वागत करताना, महाराष्ट्राच्या विकासाचा पुनश्च […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com