सुपर टाऊन मध्ये सांडपाणी निकासी नाली व नाल्याचे बांधकाम करण्याची नागरिकांची मागणी

कन्हान : –  नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्र २ मधिल सुपर टाऊन (प्रगती नगर) लोकवस्ती मध्ये सांडपाणी निकासी करिता नाल्या नसल्याने नाली व नाला बांध काम करण्याकरिता नगरवासीयानी मा नगराध्यक्षा व मुख्याधिकारी साहेब हयाना निवेदन देऊन लवकरात लवकर नाली बांधकाम करण्याची मागणी केली आहे.
         नगरपरिषद कन्हान-पिपरी अंतर्गत प्रभाग क्र २ मधिल सुपर टाऊन (प्रगती नगर) लोकवस्ती मध्ये सांडपाणी निकासी करिता नाल्या नसल्याने लोकांचे सांडपाणी मोकळ्या जागेत साचत असल्याने परिसरा त रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच बाजुलाच असलेला मोठा नाला सुध्दा कच्चा असल्याने सांडपाणी निकासी होत नसुन साचुन राहत असल्याने रोगराई चा पसार होऊ शकतो. यास्तव या लोकवस्ती मध्ये घराचे सांडपाणी निकासी करिता नाली बांधकाम करण्यात यावे. तसेच बाजुलाच अस लेल्या कच्या नाल्याचे बांधकाम सुध्दा करण्यात यावे. जेणे करून पावसाळयाचे व नेहमीचे साडपाण्याची निकासी व्यवस्थित होऊन नागरिकांना त्रास होणार नाही. करिता नगरपरिषद मा. नगराध्यक्षा, मुख्याधिका री साहेब हयाना सुपर टाऊन (प्रगती नगर) चे सर्व  नगरवासी सुर्यभान चकोले, संतोष दहीफळकर, सुतेश मारबते, दिपक गुप्ता, दिलीप बंड, दिलीप लाडेकर, संदीप पोकळे, पुंडेजी, तिवारीजी सह नागरिकांनी निवेदन देऊन मागणी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

रामटेक शहरात ठिकठिकाणी शिवजन्मोत्सव साजरा...

Mon Feb 21 , 2022
जय भवानी जय शिवाजी च्या जयघोषात दुमदुमली रामटेक नगरी ….. रामटेक :- राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती निम्मित रामटेक शहरात ठीक ठिकाणी  शिव जन्मोत्सव साजरा करण्यात आला. गांधी चौक रामटेक येथे रामराज्य ढोल ताशा पथक ने राजे शिव छत्रपतीना  मानवंदना दिली.  यावेळी रामटेकरांची गर्दी बघावयास मिळाली… शहरात , लहान मुले तरुण तरुणी , छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ माता , मावळे यांच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com