लायन्स क्लब तर्फे सेवा सप्ताह साजरा..

सावनेर : लायन्स क्लब सावनेरच्या वतीने आंतरराष्ट्रीय लायन्स सेवा सप्ताह च्या निमित्ताने चित्रकला स्पर्धा , मधुमेह – नेत्र तपासणी, वृक्षारोपण आणि महिला सक्षमीकरण यासारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. लायन्स क्लब आणि तालुका विधी सेवा समिती च्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला सक्षमीकरण या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान न्या. सौ. प्रियंका नातू यांनी भूषविले. संविधानाने महिलांना प्रदान केलेल्या अधिकाराचा योग्य वापर करावा आणि पुरुष – स्त्रियांनी मिळून जीवनातील लक्ष पार करावे असे प्रतिपादन त्यांनी केले. ॲड.पल्लवीताई मुलमुले आणि रजनीताई झोपे यांनी सुद्धा

प्रासंगिक मार्गदर्शन केले. प्रसंगी क्लब मार्फत सत्कार सुद्धा करण्यात आला. अनेकांनी नेत्र आणि मधुमेह तपासणीचा लाभ घेतला. मूकबधिर शाळेच्या अक्षय चौधरी आणि समीक्षा बनारसे या विद्यार्थ्यांनी विश्वशांती चित्रकला स्पर्धेत अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. त्यांना गौरव चिन्ह प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन ॲड. प्रियंका मुलमुले तर आभार प्रदर्शन प्रीति डोईफोडे यांनी केले. डॉ. स्वाती पुण्यानी, डॉ. स्वेता चव्हाण, डॉ. अंकिता बाहेती, सौ. नेहा ठक्कर विशेषकरून उपस्थित होत्या. नेत्र – मधुमेह तपासणी करिता डॉ. प्रवीण चव्हाण आणि रुकेश मुसळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. विवेकानंद वृद्धाश्रमात मिठाई वाटप आणि रोषणाई करून वृद्धासोबत दिवाली सुद्धा साजरी करण्यात आली. सेवा सप्ताह चे आयोजन अध्यक्ष डॉ. शिवम पुण्यानी, सचिव प्रा. विलास डोईफोडे, डॉ. परेश झोपे, किशोर सावल यांनी केले. उपक्रमाच्या यशस्वीतेकारिता वत्सल बांगरे, ॲड.अभिषेक मुलमुले, डॉ. अमित बाहेती, हितेश पटेल, डॉ. छत्रपती मानापुरे, प्रवीण टोणपे, ॲड. मनोज खांगरे, मिथिलेश बालाखे, पियुष झिंजूवाडिया, मनोज पटेल, सुशांत घटे यांचे सहकार्य लाभले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

राष्ट्रीय कॉन्टैक्टर लेबर यूनियन जोड़ो अभियान

Tue Nov 1 , 2022
नागपूर :- पूरे भारत में राष्ट्रीय कांट्रेक्टर लेबर यूनियन जोड़ो अभियान का कार्यक्रम चालू किया गया है इसमें कॉन्टैक्टर कंपनी में काम करने वाले दुकानों में काम करने वाले किसान मजदूर होटल में काम करने वाले रोड़ों में काम करने वाले जो सरकारी ड्यूटी नहीं है ऐसे भाई लोग इस यूनियन में जुड़ सकते हैं हम सब एक होकर अपने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com