– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ॲड.धर्मपाल मेश्राम यांचा पुढाकार
नागपूर :- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, नागपूर शहराचे भूषण, दूरदर्शी विकासाच्या दिशेने वाटचाल करणारे नेते देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस ‘सेवा दिवस’ म्हणून साजरा केला जात आहे. ‘सेवा दिना’च्या औचित्याने पूर्व नागपुरातील झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्याद्वारे करण्यात आला.
यावेळी त्यांच्या समवेत भटके विमुक्त जाती मोर्चा शहराध्यक्ष किशोर सायगण, प्रभाग अध्यक्ष राजेश संगेवार, बुथ प्रमुख विक्रम डुमरे, मौसमी वासनिक, राम सामंत आदींची उपस्थिती होती.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी २२ जुलै रोजी विविध सेवा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले. पूर्व नागपुरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्याचा पुढाकार भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी घेतला. आलोक किशोर थेटे, ऐश्वर्या नरेश वंजारी, इशिका सुनील कापसे, कुश संजय वासनिक, खुशी दिनेश उके या गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी भेट देउन त्यांना सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एक सामाजिक जाणिवा असलेला नेता, दूरदृष्टीचा नेता, विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा सर्वदूर विकास साधणारा नेता अशा शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा गौरव करीत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, समृद्धी महामार्गाचे निर्माण, मुंबई-नवी मुंबईला जोडणाऱ्या एमटीएचएल पुलाचे निर्माण, आंतरराष्ट्रीय विमानतळाचे निर्माण, नवी मुंबई महाराष्ट्रभरातल्या विविध शिक्षण संस्था, शेतकऱ्यांसाठी एक रुपयांमध्ये पिक विमा योजनेचा लाभ मिळवून देणे, प्रधानमंत्री सन्मान किसान सन्मान निधीच्या माध्यमातून सहा हजार रुपये शेतक-यांच्या खात्यात जमा करण्याचे काम, ओबीसींच्या आरक्षणासाठी लढा, मराठ्यांच्या आरक्षणासाठी स्वतःला वाहून घेण्याचे असे अनेक उल्लेखनीय कार्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार ‘सेवा दिवस’ म्हणून साजरा केला जात आहे. या सेवा दिनी पावसामुळे अनेक कार्यक्रम पुढे ढकलण्याची वेळ आली. मात्र गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा त्यांच्या घरी जाउन सत्कार करण्यात आल्याचेही ॲड. मेश्राम यांनी सांगितले.