यवतमाळ :- प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित केला जातो. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी स्थानिक सुट्टी असल्याने या महिन्याचा लोकशाही दिन सोमवारी ऐवजी मंगळवार दि.३ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे.
सोमवार दि.२ सप्टेंबर रोजी पोळा दर्श अमावस्या निमित्त स्थानिक सुट्टी घोषित करण्यात आली आहे. सुट्टी घोषित करण्यात आलेली असल्याने त्यानंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी म्हणजे मंगळवार दि.३ सप्टेंबर रोजी बळीराजा चेतना भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी 10 वाजता जिल्हास्तरीय लोकशाही दिन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जनतेच्या तक्रारी किंवा अभिकथने गाऱ्हानी ऐकून त्या स्विकारुन कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी कळविले आहे.