अमरावती :- राष्ट्रीय छात्र सेना अंतर्गत प्रति वर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या युथ एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत बांगला देशाकडून प्राप्त आमंत्रणानुसार स्थानिक विद्याभारती महाविद्यालयाची विद्यार्थिनी आणि 4 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन ची सिनियर अंडर ऑफिसर आकांक्षा असनारे हिची निवड झाली आहे. दिनांक 12 डिसेंबर ते 23 डिसेंबर या कालावधीमध्ये हा कार्यक्रम बांगला देशात आयोजित करण्यात आला असून भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या छात्र सेनेच्या दलात निवड झालेली ती महाराष्ट्र राज्यातील एकमेव महिला कॅडेट आहे.
बांगलादेशात 16 डिसेंबर रोजी साजरा केल्या जाणाऱ्या विजय दिवस कार्यक्रमात ती राष्ट्रीय छात्र सेनेची कॅडेट म्हणून हजेरी लावणार आहे. स्थानिक डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाची विधी शाखेची ती अंतिम वर्षाची विद्यार्थिनी असून ती माहे डिसेंबर मध्ये दिल्लीहून प्रस्थान करेल. तिने प्राप्त केलेल्या यशाबद्दल 4 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन चे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य आणि शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.