नागपूर : नागपूर महानगरपालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प लोकाभिमुख व्हावा यासाठी नागरिकांकडून संकल्पना आणि सूचना मागविण्यात येत आहेत. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या संकल्पनेतून नागपूर महानगरपालिकेमध्ये हा अभिनव प्रयोग करण्यात येत आहे.
नागपूर महापालिकेच्या अर्थसंकल्पाची तयारी सुरु झाली असून यासाठी नागरिकांच्या सूचना आणि संकल्पनांची साथ घेण्याचा विचार आयुक्तांचा आहे. राधाकृष्णन यांनी सांगितले की, लवकरच मनपाचा अर्थसंकल्प नागरिकांसमोर येणार आहे. नागरिकांना त्यांच्या क्षेत्रात कोणत्या कामाची आवश्यकता आहे, याची जाणीव या माध्यमातून प्रशासनाला होईल आणि त्या अनुषंगाने यावर निर्णय घेतला जाईल.
मुख्य लेखा व वित्त अधिकारी विलीन खडसे यांनी सांगितले की, नागपुरातील नागरिकांचा सहभाग घेण्याच्या दृष्टीकोनातून नागरिकांना खालीलप्रमाणे सूचना किंवा संकल्पना मनपातर्फे मागविण्यात येत आहे.
१) नागरिकांनी आपल्या प्रभागात भेडसावणाऱ्या महत्वाच्या समस्यांच्या निराकरणासाठी अर्थसंकल्पात तरतूद करणे आवश्यक आहे. सदर समस्या वैयक्तिक नसून व्यापक स्वरूपाची असावी.
२) शहर सौंदर्यीकरण करण्याच्या दृष्टीकोनातून राबविण्यात येऊ शकणाऱ्या विविध उपाययोजना.
३) नागरिकांना मूलभूत सोईसुविधा प्रदान करणारी – उदाहरणार्थ – रस्ते, पाणी, स्वच्छता, परिवहन आदी साठी आपल्या सूचना.
४) नागपूरला राज्यातील क्रमांक एकचे शहर करण्यासाठी सूचना
५) जबाबदार नागरिक आणि संवेदनशील प्रशासन या दृष्टीकोनातून अर्थसंकल्पाच्या माध्यमातून लागू करता येणाऱ्या उपाययोजना.
६) उत्पन्न वाढीच्या दृष्टीकोनातून आपल्या सूचना
७) मनपाच्या उत्पन्नाचे मर्यादित स्रोत पाहून नागरिकांनी आपल्या सूचना द्याव्या.
सर्व सूचना १० दिवसाच्या आत खालील नमूद ई मेल आई डी वर पाठविण्यात यावे.
Email ID : financedepttnmc@gmail.com