नागपूर :- भाषा संचालनालय आणि विदर्भ साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भाषा विकासाच्या नव्या दिशा’ या विषयावर बुधवार, 24 जानेवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता परिसंवाद आयोजित केला आहे. विदर्भ साहित्य संघाच्या सांस्कृतिक संकुलातील चौथ्या मजल्यावरील अमेय दालनात होणा-या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले राहतील.
या परिसंवादात ‘मानवी सर्जनशीलता आणि भाषा’ या विषयावर विजय तांबे, ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भाषा’ यावर मिलिंद कीर्ती आणि ‘ज्ञानभाषा मराठी-संभाव्यता आणि दिशा’ यावर अनुराधा मोहनी विचार व्यक्त करणार आहेत.
कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन भाषा संचालक विजया डोनीकर, भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख व वि.सा. संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते यांनी केले आहे.