‘व्हॉइस ऑफ मीडिया’ महिला महाराष्ट्र कार्यकारिणीची निवड  

– प्रदेशाध्यक्षपदी नाईकवाडे-रॉय, कार्याध्यक्षपदी खान, खंदारे, सरचिटणीसपदी पाटील यांची निवड.

मुंबई :- देशातील पत्रकारांची नंबर वन संघटना असलेल्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या महाराष्ट्रातील महिला कार्यकारिणीची घोषणा झाली आहे. व्हॉइस ऑफ मीडियाच्या राष्ट्रीय महिला संघटक सारिका महोत्रा, शैलजा जोगल, राष्ट्रीय संचालक संशोधन सल्लागार रेणुका कड यांनी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सुकेशनी नाईकवाडे-रॉय यांची निवड केली. सुकेशनी नाईकवाडे- रॉय यांनी राज्याच्या सर्व विभागांतून राज्य महिला पदाधिकाऱ्यांची निवड घोषित केली. ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी या निवड झालेल्या सर्व महिला पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ महाराष्ट्र राज्य महिला विभाग कार्यकारिणी पुढीलप्रमाणे प्रदेशाध्यक्ष –सुकेशनी नाईकवाडे- रॉय, बीड, कार्याध्यक्ष फराह खान- मुंबई, संजना खंदारे- छत्रपती संभाजीनगर, उपाध्यक्ष नीता सोनवणे- नागपूर, अप्सरा आगा- पुणे, सुमित्रा वसावे- नंदुरबार, दीपाली घडवजे-भाडमुखे-नाशिक, सरचिटणीस शामिभा पाटील जळगाव, सहसरचिटणीस पूजा येवला छत्रपती संभाजीनगर, जुही धर्मे- मुंबई, कोषाध्यक्ष स्वाती नाईकवाडे- खुणे धाराशिव, कार्यवाहक अहिल्या कस्पटे- लातूर, सुचिता जोगदंड- नांदेड, सहकार्यवाहक सविता चंद्रे- यवतमाळ, स्वाती रघुवंशी- वाशीम, श्रेया शिरोडकर- मुंबई, संघटक प्रियांका पाटील शेळके-बोबडे अहमदनगर, वैष्णवी मंदाले- अमरावती, गौरी आवळे -सातारा, मोनिका क्षीरसागर- कोल्हापूर, आरती जोशी- छत्रपती संभाजीनगर, अकांक्षा रक्ताटे- मुंबई, वर्षा नलावडे- मुंबई, अनुराधा कदम- कोल्हापूर, प्रवक्ता वर्षा कोडापे- चंद्रपूर, प्रसिद्धी प्रमुख- पल्लवी अटल -मुदगल हिंगोली, रेणुका सूर्यवंशी- पुणे, सोनाली मांडलिक- मुंबई, सदस्य रुची बनगैय्या अमरावती, पूनम चौरे- पालघर, पद्मा गिऱ्हे- नांदेड, मानसी देवकर- ठाणे, समीक्षा बोंडे- छत्रपती संभाजीनगर.

या निवडीनंतर सर्व महिलांना शुभेच्छा देत प्रदेशाध्यक्षा सुकेशनी नाईकवाडे- रॉय यांनी सांगितले की, येत्या आठवडाभरात सर्व विभागीय अध्यक्ष आणि जिल्हा अध्यक्ष यांची निवड केली जाणार आहे. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ च्या ‘पंचसूत्री’ शिवाय पत्रकार महिलांचे प्रश्न, पत्रकार महिलांचे स्थान, पत्रकार महिलांना मिळणाऱ्या सुविधा यावर आम्ही अधिक काम करणार आहोत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोराडी मंदिरासह विविध दुर्गादेवी मंडळांना भेट

Tue Oct 24 , 2023
नागपूर :-  उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कोराडी येथील मंदिरात श्री महालक्ष्मी जगदंबा देवी तसेच शहरातील विविध दुर्गादेवी मंडळांना भेट देवून देवीचे दर्शन घेतले. यावेळी दुर्गादेवी मंडळांकडून त्यांचे शाल व श्रीफळ देवून स्वागत करण्यात आले. फडणवीस यांनी सिरसपेठ येथील शारदीय नवरात्रोत्सव, उज्वल नगर सांस्कृतिक मंडळ, सोमलवाडा जय दुर्गा उत्सव मंडळ, धंतोली येथील द बंगाली असोसिएशन दुर्गा पूजा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!