कामगार संघटनेच्या जिल्हाप्रमुखपदी समीर मेश्रामची निवड

नागपूर :- शिवसेना, भारतीय कामगार संघटना, माथाडी आणि जनरल कामगार युनियन च्या वतीने समीर मेश्राम यांची पूर्व नागपूर (ग्रामीण) जिल्ह्यातील रामटेक आणि कन्हान-कामठी, उमरेड विधानसभेच्या जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केली आहे. हि नियुक्ती शिवसेना प्रवक्ते किशोर कन्हेरे यांच्या त्रिमूर्तीनगर येथील कार्यालयात, शिवसेना भारतीय कामगार संघटना, माथाडी व जनरल कामगार संघटना, नागपूरचे जिल्हाध्यक्ष राजेश रंगारी व ज्येष्ठ शिवसैनिक श्याम चौधरी यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

या नियुक्तीबद्दल शिवसेनेचे प्रवक्ते किशोर कन्हेरे, जिल्हाध्यक्ष राजेश रंगारी, श्याम चौधरी यांनी नवनियुक्त जिल्हाप्रमुख समीर मेश्राम यांचे अभिनंदन करून भविष्यात कामगारांच्या हिताचे काम करावे. यावेळी कैलास खंडार (तालुका प्रमुख पारशिवनी) हेमराज चोखंडरे (रामटेक तालुका प्रमुख), नरेश भोंडवे (निगम प्रमुख), सावन लोंढे (शिव वाहतुक सेना रामटेक विधानसभा प्रमुख), उमेश पौनीकर, अंकुश बच्चुरे, रोहन जाधव, कुंभार पाटील, रोहन जाधव उपस्थित होते.

यावेळी नवनियुक्त जिल्हाप्रमुखांचे अभिनंदन केले. या नियुक्तीबद्दल समीर मेश्राम यांनी शिवसेना प्रवक्ते किशोर कन्हेरे यांचे आशीर्वाद घेतले व कार्यक्रमात उपस्थितीत सर्व मान्यवरांचे आभार मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

काळजी करू नका, तुमची सुरक्षितता आमची जबाबदारी! मंत्री दादाजी भुसे यांनी प्रवाशांसोबत साधला संवाद

Fri Jul 21 , 2023
– हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची केली पाहणी नागपूर :- काळजी करू नका, तुमची सुरक्षितता आमची जबाबदारी आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे यांनी आज समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसोबत संवाद साधत दिला. समृद्धी महामार्गावर होणारे अपघात लक्षात घेता अपघात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com