एमपीएससीच्या प्रशिक्षणासाठी प्रतीक्षायादीतील 48 विद्यार्थ्यांची निवड

महाज्योती’ने घेतली विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल

नागपूर : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर या संस्थेमार्फत राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील एकूण 1500 विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एम.पी.एस.सी.) परीक्षेचे प्रशिक्षण देण्यात येते. यापैकी 48 जागा रिक्त होत्या. या रिक्त जागा भरण्याकरिता विद्यार्थ्यांनी महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांचेकडे मागणी केली होती.

महाज्योतीने विद्यार्थ्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून तातडीने निर्णय घेऊन रिक्त जागा भरण्याकरिता गुणानुक्रमानुसार 48 पात्र उमेदवारांची निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त करीत ‘महाज्योती’ने न्याय मिळवून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले आहे.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आजपासून जिल्ह्यात जागरूक पालक सुदृढ बालक अभियान

Thu Feb 9 , 2023
6 लक्ष 50 हजार बालकांची होणार तपासणी डागा स्त्री रुग्णालयात आज महाआरोग्य शिबिर नागपूर : जिल्ह्यात दि. 9 फेब्रुवारीला महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने डागा स्त्री रुग्णालय, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय आणि सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ‘जागरूक पालक सुदृढ बालक अभियान’ व महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 9 फेब्रुवारीपासून पुढील 60 दिवस नागपूर जिल्ह्यात हे अभियान […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com