– जिल्ह्यातील दोन महिला सरपंचाचा समावेश
नागपूर :- 26 जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील ‘कर्तव्यपथ’ नवी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमासाठी प्रधानमंत्री आदर्शग्राम योजनेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या नागपूर विभागातील एकूण 16 गावांच्या सरपंचांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात नागपूर जिल्ह्यातील शालु रामटेके, शालीनी मेश्राम, वर्धा जिल्ह्यातील शुभांगी अनिल कांबळे, भंडारा जिल्ह्यातील सुषमा आशिष लोणारे, ममता प्रविण इलमकर, वैशाली विलास नांदूरकर, राजनंदिनी चंद्रशेखर टेंभुर्णे, गोंदिया जिल्ह्यातील अप्सरा धरमदास डोंगरवार, विशाखा विश्वनाथ वालदे, चंद्रपूर जिल्ह्यातील कुसूम महादेव अलोणे, वर्षा रणधिर राऊत, आम्रपाली शैलेश अलोणे, लक्ष्मीबाई माधव गायेकांबळे, सुलंका रमेश लभाने, प्रभा चंद्रभान रामटेके तर गडचिरोली जिल्ह्यातील माला उत्तमप्रकाश मेश्राम व्यक्तीची निवड करण्यात आलेली आहे.
समाज कल्याण विभागाच्या आयुक्तांकडून प्रतिनिधींना विशेष अतिथी म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी कळविण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून विशेष अतिथी म्हणून निमंत्रित केल्यामुळे सर्व प्रतिनिधींचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी अभिनंदन केले.