संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- 17 मार्च ला मध्य नागपूर येथे घडलेल्या जातीय दंगली संदर्भात कामठी येथील सैलाब नगर रहिवासी एका तरुणाने सोशल मीडियाच्या इन्स्टराग्राम आय डी वरून आक्षेपार्ह कमेंट करून एका विशिष्ट समुदायाचे धार्मिक भावना दुखावण्याचे उद्देशाने इंटरनेट माध्यमाचा वापर केला त्यासंदर्भात या आरोपीविरुद्ध नवीन कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांनी आरोपी त्या आरोपीचा एम आई कंपनीचा मोबाईल जप्त करून त्या विरुद्ध बीएनएस कलम 152,192,196,299,353(1) ब,353 (1 )क,353(2 )सह कलम 67 प्रमाणे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले.अटक आरोपीचे नाव इम्रान खान मोहम्मद सलीम वय 30 वर्षे रा सैलाब नगर कामठी असे आहे.या आरोपीला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन आदेशांनव्ये सदर आरोपीची नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.