“पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणे सुरुच ठेवल्यास त्यांच्याशी चर्चा होणार नाही”
भारताशी आगळीक करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आमचे सशस्त्र दल सक्षम आणि सज्ज: संरक्षण मंत्री
मुंबई :-“सीमा सुरक्षित करणे, लोकांची सुरक्षा आणि राष्ट्राची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करणे ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे,” असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 14 मे 2023 रोजी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथे एका कार्यक्रमात बोलताना सांगितले. सर्व प्रकारच्या धोक्यांपासून देशाचे रक्षण व्हावे आणि विकासाच्या मार्गावर देशाची अभूतपूर्व गतीने वाटचाल व्हावी यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केले.
“आज जम्मू आणि कश्मीरमधून कलम 370 रद्द करण्यात आले आहे. दहशतवादी, कट्टरपंथी आणि नक्षलवादाच्या विरोधात प्रभावी कारवाई करण्यात आली आहे. देशांतर्गत आणि बाह्य दोन्ही आघाड्यांवर पूर्णपणे सुरक्षित आहे. उरी आणि पुलवामाच्या घटनेनंतर, आपण देशांतर्गत किंवा सीमेपलीकडील दहशतवादाशी लढण्यासाठी आणि त्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी सज्ज आहोत, असा संदेश सर्जिकल स्ट्राईक आणि हवाई हल्ल्यांद्वारे आपल्या सशस्त्र दलांनी दिला आहे, असे त्यांनी सांगितले. काही भारतविरोधी शक्तींना आपली प्रगती आणि ताकद पचवता येत नाही. भारताला थेट तोंड देण्याची ताकद त्यांच्यात नसल्यामुळे ते दहशतवादासारख्या छुप्या युध्द मार्गाचा अवलंब करतात. पाकिस्तान हे दहशतवाद्यांचे सुरक्षित आश्रयस्थान राहिले तर त्यांच्याशी कधीही चर्चा होऊ शकत नाही, असेही ते म्हणाले. की भारताच्या बाबतीत आगळीक करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल, हे आपण छत्रपती शिवाजी आणि महाराणा प्रताप यांच्यासारख्या महान क्रांतिकारकांकडून शिकलो आहोत. यासाठी आपले सशस्त्र दल सक्षम आहे आणि प्रत्यक्ष कृती करण्यासाठी देखील सज्ज आहे,” असे संरक्षण मंत्र्यांनी सांगितले.
आत्मनिर्भरतेमुळे देशाच्या संरक्षण क्षेत्रात होत असलेल्या वाढीकडे राजनाथ सिंह यांनी लक्ष वेधले ज्यामुळे सशस्त्र दल अधिक बळकट होत आहे आणि सर्व प्रकारच्या आव्हानांना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी त्यांना अत्याधुनिक शस्त्रे/उपकरणांनी सुसज्ज करत आहे.
त्यांनी सकारात्मक स्वदेशीकरण सूची जारी करण्यासह संरक्षण क्षेत्रात ‘आत्मनिर्भरतेला’ प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने केलेल्या विविध उपाययोजनांचा उल्लेख केला. ते म्हणाले की भारत केवळ स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी संरक्षण उपकरणे निर्मिती करत नाही तर मित्र देशांच्या सुरक्षा विषयक गरजा देखील पूर्ण करत आहे. “अलिकडच्या काळात आपल्या संरक्षण विषयक निर्यातीने मोठी झेप घेतली आहे. सात-आठ वर्षांपूर्वी ही निर्यात 1,000 कोटी रुपयांपेक्षा कमी होती, ती आज, 2022-23 या आर्थिक वर्षात विक्रमी 16,000 कोटी रुपयांवर गेली आहे,” असे ते म्हणाले.
संरक्षणासह सर्व क्षेत्रांनी देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यात योगदान दिले आहे आणि भारत ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे असे संरक्षण मंत्र्यांनी नमूद केले. 2027 पर्यंत भारताची गणना जगातील अव्वल तीन अर्थव्यवस्थांमध्ये होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संपूर्ण जगात आपली ओळख निर्माण करताना आपला सांस्कृतिक वारसा आणि मूल्ये यांचा अभिमान असलेल्या एका मजबूत, समृद्ध, आत्मनिर्भर ‘नवभारत ‘ ची उभारणी करायची आहे यावर त्यांनी भर दिला.
2047 पर्यंत भारताची स्वप्ने साकार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात सांगितलेल्या पाच प्रणांमध्ये ‘गुलामगिरीच्या सर्व खुणा पुसून टाकणे’ आणि ‘आपल्या वारशाचा अभिमान बाळगणे’ यांचा समावेश आहे असे सांगून संरक्षणमंत्र्यांनी देशाचा सांस्कृतिक वारसा आणि मातृभूमीसाठी अतुलनीय योगदान देणारे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी आणि महाराणा प्रताप यांसारख्या वीरांबद्दल जाणून घेण्याचे आवाहन केले. ते पुढे म्हणाले की, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली देशात सांस्कृतिक पुनरुज्जीवन होत आहे आणि सांस्कृतिकदृष्ट्या सुरक्षित वातावरणाकडे देश वाटचाल करत आहे.
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सांस्कृतिक संपत्तीची पुनर्स्थापना वेगाने होत आहे, असे सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करताना सांगितले.
ते म्हणाले की ‘शाश्वत भविष्य’ या विषयावरील चर्चा, आपल्या पुढच्या पिढीला काय वारसा देते यावर लक्ष केंद्रित करणारी असेल. सांस्कृतिक स्थळे आर्थिक घडामोडींशी जोडली जावीत आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी अशा स्थळांवर पर्यटन विकसित केले जावे, असेही ते म्हणाले. अशा स्थळांवर तंत्रज्ञानाचा प्रचार केला जाईल, असेही त्यांनी अधोरेखित केले.
पद्मश्री सुदर्शन पटनायक यांचे एक उत्कृष्ट असे वाळू कला प्रदर्शन पुरीच्या समुद्र किनार्यावर आयोजित करण्यात आले होते. ‘कल्चर युनाइट्स ऑल’ या संकल्पनेनुसार तयार करण्यात आलेल्या या वाळू कला प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय पर्यटन, संस्कृती आणि ईशान्य प्रदेश विकास मंत्री जी. किशन रेड्डी आणि सांस्कृतिक आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते करण्यात आले.
सांस्कृतिक कार्य गटाची तिसरी बैठक भुवनेश्वरमध्ये पुढील 2 दिवसांच्या चर्चेनंतर,15 ते 18 जुलै 2023 दरम्यान हम्पी येथे होणार आहे. ऑगस्ट 2023 च्या अखेरीस सांस्कृतिक मंत्र्यांची बैठक वाराणसीमध्ये होणार आहे.