हंगामी कामगारांना एसबीकडून मिळणार प्रवेशपत्रे

– प्रतीक्षा हिवाळी अधिवेशनाची

– चार हजार हंगामी कामगारांना मिळेल रोजगार

– सार्वजनिक बांधकाम प्रशासन सज्ज

नागपूर :-हंगामी कामगारांना हिवाळी अधिवेशनाची प्रतीक्षा असते. महिना, दोन महिन्यांच्या कामाच्या भरवशावर ते कुटुंबाच्या आर्थिक योजना आखत असतात. या कामाच्या भरवशावर मुलांच्या शाळेचे शुल्क, उसनवारी किंवा वर्षभर्‍याचे धान्य खरेदी केले जाते. त्यामुळे त्यांच्यासाठी या दृष्टीने हिवाळी अधिवेशन महत्त्वाचे असते. यंदा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्या पृष्ठभूमीवर हंगामी कामगारांची मोठ्या प्रमाणावर गरज भासणार आहे. जवळपास चार ते साडेचारहजार युवकांच्या हाताला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रीत्या रोजगार मिळणार आहे. विशेष म्हणजे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पहिल्यांदाच पोलिसांच्या विशेष शाखेकडून कामगारांना प्रवेशपत्रे दिले जाणार आहे.

विधानभवन, देवगिरी, रामगिरी, रविभवन, नागभवन, आमदार निवास, सुयोग, शासकीय निवासस्थाने, 160 खोल्यांचे गाळे आदी ठिकाणची स्वच्छता, रंगरंगोटी, इलेक्ट्रिक फिटिंग, वीज, पाणी, डागडुजीसह राहण्यासंबंधीच्या सोईसुविधा, अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, बगिचे फुलविणे, त्याचप्रमाणे खुर्च्या, टेबलची स्वच्छता करणे, दुरुस्ती, सर्व सामान व्यवस्थित लावणे, बंगल्यावर सेवा व दैनंदिन कामांसाठी मदत करण्यासाठी हंगामी कामगारांची नियुक्ती केली जात असते. दोन आठवडे चालणार्‍या अधिवेशनासाठी सर्व बंगले आणि शासकीय निवाससस्थाने सज्ज ठेवण्यासाठी कामाला सुरुवात झाली आहे.

यासोबतच आमदारांसाठी असलेल्या कॅण्टिन आणि प्रतीक्षालयाची रंगरंगोटी व नवीनीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. जुन्या फर्निचरची दुरुस्ती आणि काही फर्निचर नव्याने घेण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. या सर्व कामांवर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता संजय उपाध्ये लक्ष ठेवून आहेत.

हंगामी कामगारांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू

हिवाळी अधिवेशनानिमित्त कामगारांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा जवळपास चार ते साडेचार हजार कामगारांच्या हाताला रोजगार उपलब्ध होईल. कामगारांना किमान वेतन दिले जाईल, याकडे साबां प्रशासनाचे विशेष लक्ष असेल. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पहिल्यांदाच साबां प्रशासनाच्या शिफारसीवरून कामगारांना पोलिसांच्या विशेष शाखेकडून प्रवेशपत्र दिले जाणार आहे. अधिवेशनाशी संबंधित सर्व कामे सुरळीत होण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.

संजय उपाध्ये, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रवाशांचे मोबाईल चोरणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

Mon Nov 13 , 2023
– मेलवर आलेल्या तक्रारीची तत्काळ दखल – सहा मोबाईल जप्त, मुळ मालकांचा शोध नागपूर :- गोपनिय माहितीच्या आधारे रेल्वेत चोरी करणार्‍या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून वेगवेगळ्या गाड्यातील प्रवाशांचे चोरी केलेले 6 मोबाईल जप्त करण्यात आले. रामू यादव (45) रा. भाटापारा, तिलदार असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. पोलिस जप्त केलेल्या मोबाईल धारक मालकाशी संपर्क करण्याच्या प्रयत्नात आहेत. आरोपीने आता […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com