नवेगाव-नागझिरा व्याघ्र क्षेत्रात एनटी -2 वाघीनीच्या पिलांचा शोध

– व्याघ्र संवर्धनात यश उपवनसंरक्षक पवन जेफ यांची माहिती

भंडारा :- नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प (NNTR), गोंदिया येथे व्याघ्र संवर्धनासाठी महाराष्ट्र वन विभागाने राबविलेल्या वाघाचे संवर्धन स्थानांतरण, (Tiger Conservation Translocation) उपक्रमामध्ये आतापर्यंत एकूण 3 वाघीन नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये स्थानांतरण करण्यात आल्या आहे. त्यात पहिल्या टप्यामध्ये NT-1 व NT-2 हया वाघीनीला दिनांक 20/05/2023 रोजी व दुसऱ्या टप्यामध्ये NT-3 या वाघीनीला दि. 11/04/2024 ला नागझिरा वन्यजीव अभयारण्य येथे निसर्गमुक्त करण्यात आले होते.

त्यामध्ये NT-2 वाघिणीने नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रामध्ये सहजपणे आपली जागा निर्माण केली आणि आता सद्यास्थितीमध्ये ट्रॅप कॅमेराद्वारा NT-2 वाघिणीच्या हालचालीवर संनियंत्रण करण्यात येत आहे. या ट्रॅप कॅमेरामध्ये NT-2 वाघिणीचे प्रथमतःच तिच्या 3 छाव्यांसोबत रानगव्याच्या शिकारीवर फोटो प्राप्त झाला आहे. सद्या निसर्गमुक्त केलेल्या 3 वाघीनीपैकी 2 वाघीन ने नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात (गाभा व बफर) आपला अधिवास निर्माण केला आहे. NT-2 वाघीनीच्या पिलांच्या जन्मामुळे प्रकल्पाच्या उद्दिष्टांना नवे यश व दिशा प्राप्त झाल्याची माहिती उपवनसंरक्षक पवन जेफ यांनी दिली.

NT-2 वाघिणीच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवण्यासाठी VHF/GPS कॉलर आणि कॅमेरा ट्रॅप यासारखी आधुनिक साधने वापरण्यात आली होती. ज्यामध्ये Command & Control Room चा महत्वाचा वाटा आहे. तसेच या यशामध्ये अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महाराष्ट्र राज्य नागपूर,अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव पुर्व) नागपूर यांचे मार्गदर्शनार्थ तसेच जयरामेगौडा आर. (भावसे) क्षेत्रसंचालक, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र, गोंदिया, पवन जेफ (भावसे) उपसंचालक, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र, साकोली, प्रमोद पंचभाई (भावसे) उपवनसंरक्षक गोंदिया, अतुल देवकर, विभागीय वन अधिकारी गोंदिया, सचिन डोंगरवार, सहायक वनसंरक्षक गोंदिया, व्ही. के. भोसले, तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी नागझिरा, कु. सपना टेंभरे, वनपरिक्षेत्र अधिकारी उमरझरी, दिलीप कौशीक, वनपरिक्षेत्र अधिकारी गोंदिया व वनविभागातील इतर कर्मचारी यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.

तसेच महाराष्ट्र वन विभाग व नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील या यशामुळे भविष्यातही मोलाचे योगदान देऊन व्याघ्र संवर्धनासाठी अधिक उत्साहाने कार्य करत राहतील.असे श्री.जेफ उपसंचालक,नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प राखीव क्षेत्र साकोली विभागानी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भंडारा जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तु कायदा 1955 अंतर्गत 50,67,000/-किमतीचा मुद्देमाल जप्त

Fri Dec 13 , 2024
भंडारा :- 11 सप्टेंबर, 2014 रोजी वाहन क्र. एम. एच 26 सी एच 7373 मध्ये सार्वजनिक वितरण प्रणाली मध्ये वितरीत करामात वाशीम वरुन गांविया गंधे जात असल्याची माहिती मिळाली. सदर वाहन स्थानिक गुन्हेशाखा भंडारा पथकाच्या सहात्याने पोलीस मुख्यालय येथे आणून भंडारा तालुकयाचे निरीक्षण अधिकारी वी पोचीराम कापडे व पोलीस पथक भंडारा यांनी वाहनातील तांदळाची तपासणी केली. तपासणी मध्ये सदर तांदळामध्ये […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com