उच्च ध्येयासक्तीने प्रेरीत होवून वैज्ञानिकांनी कार्य करावे ; नोबेल पुरस्कार विजेत्या ॲडा योनाथ यांचा वैज्ञानिकांशी संवाद

नागपूर : “1980मध्ये रायबोजोम संरचनेच्या शोधाला सुरुवात केली तेथून सहा वर्षांनी या संशोधनात पहिले यश हाती आले. हा आनंद अल्पजीवी मानून उच्च ध्येयासक्तीने संशोधनात कार्यरत राहिले म्हणूनच 2009 च्या रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कारावर नाव कोरू शकले. वैज्ञानिकांनी उच्च ध्येयासक्तीने प्रेरीत होवून कार्य केल्यास त्यांचे कार्य अखिल मानवजातीसाठी एक श्रेष्ठ कार्य ठरेल”, अशा शब्दात नोबेल विजेत्या इस्त्रायली वैज्ञानिक ॲडा योनाथ यांनी आज वैज्ञानिकांशी संवाद साधला.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विज्ञापीठात आयोजित 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये मुख्य कार्यक्रमस्थळी ॲडा योनाथ यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. भारतीय विज्ञान काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. विजयलक्ष्मी सक्सेना, ॲडा योनाथ यांची कन्या अदी योना, कुलगुरु डॉ सुभाष चौधरी, प्र-कुलगुरु डॉ.संजय दुधे, अधिष्ठाता डॉ. राजू हिवसे, डॉ श्याम कोरट्टी मंचावर उपस्थित होते.

ॲडा योनाथ यांनी ‘एव्हरेस्टच्या पलिकडील एव्हरेस्ट’ हा व्याख्यानाचा विषय निवडून सभागृहात उपस्थित देशभरातील वैज्ञानिकांना संबोधित केले. आपल्या व्याख्यानात श्रीमती योनाथ यांनी मानवी शरीरातील रायबोजोमची संरचना शोधण्याच्या ध्येयाने प्रेरित होवून दक्षिण व उत्तर ध्रुवावरील प्राण्यांचा अभ्यास व त्यातील रोमहर्षक किस्से त्यांनी सांगितले. मृत समुद्रावरावर (डेड सी) जीवाणुंचा शोध घेवून त्यांच्यातील रायबोजोमचे केलेले संशोधन आणि एकदा तर उणे 195 अंश सेल्सियस तापमानात प्राप्त डेटा संग्रहीत करण्याचे कार्य केलं, याबाबींवर त्यांनी प्रकाश टाकला.

रायबोजोम संरचनेच्या संशोधन कार्यास 1980 मध्ये सुरुवात केली. थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन, मेरी क्युरी यांचा आदर्श ठेवून त्यांच्या संशोधनाचा अन्वयार्थ लावत आम्ही पुढे गेलो. या संशोधनाच्या प्रवासात 1986 आम्ही H5OS चा शोध लावण्यात यश आले. तेव्हा वाटले होते की हेच हिमालयाचे शिखर आहे पण वर बघितले तर लक्षात आले अजूनही हिमालयाचे शिखर गाठणे शिल्लक आहे. पुन्हा संशोधन कार्यास जोमाने सुरुवात केली. 50 हजार पद्धतीच्या प्रोटीनचा तसेच 20 प्रकारच्या अमिनो ॲसिड, पेशी आणि तंतुंचा अभ्यास केला. संशोधन कार्याला गती येत गेली . रायबोजोमच्या जटील संरचनेचा एक एक अर्थ लागत गेला आणि आमचे संशोधन पुर्णत्वास गेले. थोड्या यशात आनंद न मानता उच्च ध्येयासक्तीने प्रेरीत होवूनच जनहिताचे संशोधन होवू शकते,याची प्रचिती आल्याचे त्यांनी सांगितले.

संशोधन कार्यात भारतीय वैज्ञानिक वेंकटरामन रामकृष्णन यांनी केलेल्या मोलाच्या योगदाना बद्दलही योनाथ यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

ॲडा योनाथ यांना नागपूर विद्यापीठाचे सुवर्णपदक

रसायन शास्त्रातील संशोधनात मोलाचे योगदान देवून समस्त जगासाठी आदर्शवत कार्य करणाऱ्या नोबेल विजेत्या ॲडा योनाथ यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्यावतीने कुलगुरु डॉ सुभाष चौधरी यांच्या हस्ते सुवर्ण पदक प्रदान करून गौरविण्यात आले.

कुलगुरु डॉ सुभाष चौधरी यांनी स्वागतपर भाषण केले. सूत्रसंचालन व आभार डॉ श्याम कोरोट्टी यांनी मानले.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पाण्याचे मूल्य समजून शाश्वततेकडे वाटचाल आवश्यक! ‘वॉटर व्हीजन-2047’ मध्ये देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

Sat Jan 7 , 2023
भोपाळ :-पाणी हे निसर्गाने आपल्याला मुक्तहस्ते दिले असले तरी त्याचे मूल्य खूप मोठे आहे. ते मूल्य ओळखूनच जलशाश्वततेकडे आपल्याला वाटचाल करावी लागेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. जलसंरक्षणाचे सामूहिक प्रयत्न म्हणून केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने कुशाभाऊ ठाकरे आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटर, भोपाळ येथे आयोजित 2 दिवसीय संमेलनात ते बोलत होते. यातील ‘वॉटर गव्हर्नन्स’ या विषयावरील एका सत्राच्या अध्यक्षस्थानी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com