10वीच्या विद्यार्थ्यांचे शास्त्रीय कला, चित्रकला व लोककला प्रस्ताव पाठविण्यास शाळांना 16 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

नागपूर :- माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.10वी) लेखी परीक्षेसाठी प्रविष्ट होणारे विद्यार्थी अतिरिक्त गुणांपासून वंचित राहू नये याकरिता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव माध्यमिक शाळांकडून विभागीय मंडळाकडे पाठविण्यासाठी 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या 24 नोव्हेंबर 2017 च्या शासन निर्णयानुसार शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्यात येतात. या ‍निर्णयानुसार विद्यार्थ्यांकडून शाळांकडे 15 डिसेंबर 2023 अखेर व शाळांनी विभागीय मंडळांकडे 15 जानेवारी 2024 पर्यंत हे प्रस्ताव सादर करण्याचे नमूद आहे. मात्र, शासकीय रेखाकला परिक्षेचा निकाल उशिरा लागल्याने शास्त्रीय कला, चित्रकला व लोककलेचे प्रस्ताव सादर करण्यास महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 15 जानेवारी 2024 च्या पत्रानुसार 10 फेब्रुवारी 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

या मुदतवाढीनंतर काही तांत्रिक अडचणींमुळे निर्धारित वाढीव मुदतीत माध्यमिक शाळांना विद्यार्थ्यांच्या अतिरिक्त गुणांचे प्रस्ताव सादर करता न आल्याने मुदतवाढीबाबत विविध स्तराहून मागणी होती. तसेच कोणताही पात्र विद्यार्थी अतिरिक्त गुणांपासून वंचित राहू नये म्हणून विद्यार्थ्यांचे शास्त्रीय कला, चित्रकला व लोककलेचे प्रस्ताव माध्यमिक शाळांकडून विभागीय मंडळाकडे पाठविण्यासाठी 16 फेब्रुवारी 2024, सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

कोणताही पात्र विद्यार्थी अतिरिक्त गुणांच्या सवतलीपासून वंचित राहू नये, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी सर्व माध्यमिक शाळा, सर्व विभागीय मंडळांना केले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता १०वीची लेखी परीक्षा १ मार्च ते २६ मार्च २०२४ दरम्यान घेण्यात येणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्याचे केंद्रीय स्तरावरील प्रश्न महायुतीचे नूतन खासदार सोडवतील भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास

Wed Feb 14 , 2024
मुंबई :- अशोक चव्हाण, प्रा. मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे हे भारतीय जनता पार्टीचे तिन्ही उमेदवार राज्याचे प्रश्न केंद्रीय स्तरावर मांडून ते सोडविण्यासाठी प्रयत्न करतील, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी व्यक्त केला. भाजपा प्रदेश कार्यालयात बावनकुळे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी खा.संजय काका पाटील, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com