भंडारा :- फीट इंडीया क्वीज़ मोहीमेअंतर्गत राज्यातील सर्व माध्यमाच्या, व्यवस्थापनाच्या शाळा व महाविद्यालयाची नोंदणी करण्यासाठी 10 नोव्हेंबर,पर्यत मुदतवाढ फीट इंडीया मोहीमेअंतर्गत न करणाऱ्या शाळांकडून खुलासा मागविण्याचे आदेश देण्यात आले आहे.
ज्या शाळांनी ऑनलाईन नोंदणी केलेली नाही अशा शाळांनी दि. 10 नोव्हेंबर, 2023 पर्यंत नोंदणी करावी. ही तारीख शेवटची आहे. शाळा नोंदणी ऑनलाईन पोर्टलवर जावून करावी लागणार आहे. यासाठी डेक्सटॉप, कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपचा वापर करावा. फीट इंडीया क्वीज 2023 एनटीए पोर्टल अंतर्गत शाळा नोंदणीबाबत https://fitindia.nta.ac.in यालिंकचा वापर करावा.
खेलो इंडिया क्वीज या अॅपवर शाळा व महाविद्यालयातील खेळाडू मुले व मुलींनी नोंदणी करावी. अॅनरॉईड मोबाईल, डेक्सटॉप, कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपचा https://fitindia.nta.ac.in यालिंकचा वापर करावा. शाळेत शारीरिक शिक्षक उपलब्ध नसल्यास संबंधित प्राचयांनी किंवा मुख्याख्यापकांनी या कामासाठी 01 सहाय्यक शिक्षकाची नियुक्ती करावी. या कालावधीत शाळांनी नोंदणी न केल्यास संबंधित तालुक्याच्या गट शिक्षणाधिकारी यांचे मार्फत शाळेकडून खुलासा मागविण्यात येईल.
शाळेत जर एक शिक्षण असेल तर त्याच शिक्षकानी आपली नोंदणी करावी, तरी सर्व शाळांनी नोंदणीची प्रक्रीया दि. 10 नोव्हेंबर, 2023 रोजीपर्यंत करणे बंधनकारक आहे. नोंदणी करतांना भंडारा जिल्हयातील सर्व शाळा किंवा महाविद्यालये व आयटी शिक्षकांनी यासाठी पुढाकार घेवून शाळा व शिक्षक नोंदणीसाठी शाळांना सहकार्य करावे,
असे आवाहन उप महानिदेशक भारतीय खेल प्राधीकरण श्रीमती एकता विश्नोई, यांनी कळविले आहे. त्यानुसार भंडारा जिल्हयातील सर्व शाळा व महाविद्यालये यांनी दि. 10 नोव्हेंबर 2023 पूर्वी हा कार्यक्रम राबवून शासनाचा हा उपक्रम यशस्वीरीत्या राबवावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्य.)संजय डोरलीकर, तसेच शिक्षणाधिकारी (प्राथ.) रविंद्र सोनटक्के, व जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती आशा मेश्राम यांनी केले आहे.