नागपूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे विविध शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात. महाडिबीटी संगणकीय प्रणालीत चालु शैक्षणिक सत्रासाठी नवीन अर्ज व नुतनीकरणाचे अर्ज 14 डिसेंबर पासून ऑनलाईन प्रक्रिया सुरु झालेली आहे. विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी या प्रक्रियेस 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय याची नोंद घ्यावी, असे समाज कल्याण सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी कळविले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज, योजनेचे निकष, अटी व शर्ती याबाबतची माहिती http://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आवश्यक कागदपत्राची पुर्तता करुन अर्ज विहित मुदतीत नोंदणीकृत करण्यात यावे जेणेकरुन सर्व पात्र विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ घेता येईल.
नुतनीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणताही नवीन युजर आयडी क्रियेट न करता गतवर्षीचा आधारबेस युजर आयडी वापरुन त्यांनी चालु वर्षाचा अर्ज नुतनीकरण करावयाचा आहे. शिष्यवृत्ती व फ्रीशिपसाठी पात्र सर्व विद्यार्थ्यांनी तात्काळ नोंदणी करुन घ्यावी अर्जाचे नोंदणीकरण विशिष्ट कालावधीसाठी असल्याने मुदत संपल्यानंतर नोंदणीकरण करता येणार नाही. नोंदणीकरण प्रथम प्राधान्याने करावे. अधिक माहितीसाठी संबंधित महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभागातर्फे करण्यात आले आहे.
सर्व महाविद्यालयांनी शिष्यवृत्तीस पात्र असलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज तपासून घ्यावे व पात्र अर्ज तत्काळ पाठवावे. जेणेकरुन अर्ज मंजूर करुन लाभार्थ्यांना लवकरात लवकर शैक्षणिक लाभ अदा करता येईल.
शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com